Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील विरोधी पक्ष प्रत्येक शहरातील रस्त्यासाठी आक्रमक होत आंदोलने करीत आहे तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर चक्क रस्त्याचे दोन भाग झाल्याचे दिसून आले आहे. धरणगाव तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आलेले आहे. या रस्त्याने जाणारे प्रत्येक नागरिक या रस्त्याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण या मुख्य रस्त्याच्या मधोमध एक मोठी भेग पडली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अळकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला या ठेकेदाराने मुरूम देखील टाकलेला नसल्याने आरोप शेतकरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दि 9 रोजी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका कर्मचाऱ्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचून लिपीक शशिकांत नारायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाची यात्रेची जबाबदारी नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे असतांना ते राज्यभर बाळासाहेबांचे विचार मांडत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आता अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले कि, राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे, यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांना बोलता…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळुन युवकाने आत्महत्या केली आहे. तरुणाने आत्महत्या करण्याआधी स्वत:च्या मोबाईलमध्ये video काढला. या व्हिडीओत त्याने आपण इतका टोकाचा निर्णय का घेत आहोत, याचं कारण सांगितलं आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘परमेश्वराकडे जाऊन मी त्याला मागणी मागेल की पुन्हा माणसाचा जन्म मला देऊ नको. घरातील सगळे चांगले आहेत. माझी पत्नी जिच्यावर मी खुप प्रेम केलं पण तिचं प्रेम दुसऱ्यावर आहे. म्हणुन मी स्वतःला संपवत आहे’,असं तरुण आत्महत्या करण्यापुर्वी व्हिडीओत म्हणाला आहे.सबंधित घटना ही बीड शहरात घडली आहे. मनोज आप्पासाहेब काळे(वय 24 वर्ष) आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  बोरे खाण्याचे आमिष देत  सहा वर्षाच्या बालिकेला नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता याप्रकरणी चोपडा तालुक्यातील आडगाव येथील बाबूलाल बारकू भिल याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका सहा वर्षाची बालिकेला तिचे आई वडील तिला आजीजवळ सोडून शेतात मजुरीसाठी गेले असताना गावातील बाबूलाल बारकू भिल वय २८ याने पीडित सहा वर्षाच्या बालिकेला बोरे खाण्याचे आमिष दाखवून नाल्यात घेऊन गेला. तिचे हात बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथून भावलाल कोळी घराकडे जाताना त्याची नजर या गैरप्रकारकडे गेली. हे पाहताच बाबूलाल तेथून पळून गेला. भाऊलाल…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  प्रेरणा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन महिलांकडील पर्स चोरट्यांनी लांबवली. यात सहा लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम होती. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार ५ रोजी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमधील वडोदरा येथील वंदना दादाराव मेश्राम (५५) या पती व मुलासह गाडी क्र. २२१३८ प्रेरणा एक्स्प्रेसने नागपूरकडे जात होत्या. या गाडीने जळगाव स्थानक सोडल्यानंतर चोरट्याने वंदना मेश्राम तसेच याच बोगीतील पुष्पलता सांभारे या दोन्ही महिलांची पर्स लांबवली. एका पर्समधून चार तोळे सोन्याची मोहन माळ, दोन तोळ्याच्या दोन बांगड्या, पंचवीस हजाराचा मोबाइल आणि एक लाख रुपये रोख असे चार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशात जोरदार चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे गुजरातच्या निवडणुकीचा आज निकाल येत असतानाच पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रामेश्वर कॉलनी येथे जुन्या भांडणातून सचिन चव्हाण व नितीन राठोड यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तिघांना न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अखेर मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील, विकास सातदिवे, संदीप धनगर, किरण पाटील यांनी सम्राट कॉलनी येथून तुषार सोनवणे तसेच रामेश्वर कॉलनीमधून प्रतीक पांडुळे व गुलाब बाबा कॉलनीतून नयन येवले यांना अटक केली. बुधवारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी रामदास कॉलनीमधील निरामय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीतून ६० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील धार येथील विशाल पाटील हा शिक्षणासाठी सध्या रामदास कॉलनीमधील निरामय अपार्टमेंटमध्ये मित्र प्रथम सोनवणे, प्रीतम जावळे, विशाल पाटील, पंकज इंगळे, चेतन भिरूड, विश्वेश महाजन, निखिल सावळे, धनश्याम धांडे यांच्यासह राहतो. सोमवारी रात्री पंकज आणि विशाल हे लॅपटॉपवर अभ्यास करीत होते. नंतर त्यांनी आपापले लॅपटॉप टेबलवर ठेवले. मंगळवारी सकाळी सात वाजता विश्वेश व पंकज हे पेपर देण्यासाठी खोलीबाहेर निघाले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जळगाव येथील पोलिमेड फार्मासिटिकल प्रा. लि. या कंपनीला भेट देऊन औषधनिर्माण शास्त्राची माहिती करून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती सरव्यवस्थापक श्री सुनील यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. यात औषधनिर्माणची प्रक्रिया, त्यात वापरले जाणारे विविध ड्रग्स व पॅकिंग संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. यावेळी प्रा राहुल पाटील, प्रा. अमोल पवार यांच्या मार्गदर्शनात एकूण 58 विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक विजिटमध्ये सहभाग घेतला. अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशालदादा देवकर व प्रा योगेश पवार यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Read More