Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील बंद पडलेले जुने मिटर बदलवून त्याच्या जागी नवीन मीटर बसवून कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी स्वतः साठी व कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी 10 हजाराची लाच मागून त्यातील 5 हजार रुपयांची लाच स्विकारतांना धुळे येथील लाच लुचपत विभागाने वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञास ताब्यात घेतले आहे. तक्रारदार यांचे क्रांती नगर भागात घर असून त्यांचे मीटर गेल्या पाच महिन्यापासून बंद होते. तरी देखील सरासरी रकमेची बिल आकारणी सुरू होती. आणि तक्रारदार त्याचा नियमित भरणा करीत होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांनी तक्रारदार यांच्या मीटर ची पाहणी घरी जाऊन केली होती. त्याविभागतील वायरमन भरत पाटील हे तक्रारदार यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पोट भरण्यासाठी नेहमी शहरात येवून दिवसभर पेरुची विक्री करुन दुचाकीवर घराकडे परतणार्‍या दुचाकीस्वारांना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या कारने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील हनुमान मंदिराजवळ घडली. या अपघातात रफिक हुसेन मेवाती (वय-23),अरबाज जहांगीर मेवाती (वय-20) दोन्ही रा.राणीचे बांबरुड ता.पाचोरा या हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे रफिक हुसेन मेवाती व अरबाज जहाँगीर मेवाती हे दोघ कुटुंबियांसह वास्तव्यास होते. रफिक हा दररोज भावंडांसोबत जळगावात पेरु विक्री करण्यासाठी येत होता. दरम्यान, रफिकने मास्टर कॉलनीत दिवसभर पेरु विक्री करुन तो सायंकाळी…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  आठ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या मुलीच्या प्रियकराने तिच्या पतिवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली. हि घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा ते दूई दरम्यान घडली. याबाबत रात्री उशिरा नोंद करण्यात आली असून प्रियकरासह पत्नी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मध्यप्रदेशातील अंबाडा तालुका नेपानगर जिल्हा बऱ्हाणपूर येथील अरविंद रवींद्र सुलताने (वय 23 वर्षे ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे की , गेल्या आठ दिवसापूर्वी कुऱ्हा काकोडा येथील वर्षा बघे या मुलीशी लग्न झाले होते त्यानंतर काल चार रोजी फिर्यादी अरविंद सुलताने हा त्याच्या पत्नीला अंबाडा येथे सासरी घेऊन जात असताना रस्त्यातच पूर्णाड फाटा ते दूई…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  परदेशी वेब सीरिज बनवण्याच्या नावाखाली स्ट्रगलर स्त्री कलाकाराला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराच्या तक्रारीनंतर निर्माता आणि दिग्दर्शक यास्मीन खानसह चार आरोपींविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या टोळीचा कारनामा उघडकीस आला आहे. यास्मीन, अनिरुद्ध प्रसाद जंगडे, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे यास्मीन खानला दीड वर्षापूर्वी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने खलबतं सुरु आहेत. आज मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत चौथा पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची आणि आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामधील भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आला होता. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत प्राथमिक चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, विनायक…

Read More

राज्यातील विविध भागात नोकरीच्या जागा रिक्त झाल्याने त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्याचे कार्य सुरु आहे. तर औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमधील काही पदांसाठी सातवी आणि दहावी पास उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहेत. शिवाय आयटीआय झालेले विद्यार्थी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट : कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता : पदवीधर, टायपिंग, MS-CIT एकूण जागा : 04 वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023 तपशील : aurangabad.cantt.gov.in पोस्ट : ड्रेसर, इलेक्ट्रिशियन,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जागतिक दिव्यांगदिनानिमित्त धरणगाव येथे पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया कार्यक्रमात धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार राजाराम देवरे यांचा अपंग बांधवासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून अपंग बांधवांसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तहसीलदार देवरे यांनी अपंग बांधवांचे कोणतेही शासकीय काम असो ते अतिशय ततपरतेने केले असून कोरोना कालावधीत अपंगांना शिधावाटप,महाराजस्व शिबिराद्वारे रेशनकार्ड वितरण इ वाटप केले आहे. या कामाची दखल घेण्यात आली.याप्रसंगी पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील,प्र जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,अपंग महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील व इतर अधिकारी हजर होते. या ही अधिकाऱ्यांचा झाला सन्मान नगरपरिषद मुख्याधिकारी जनार्दन…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था  राज्यातील सोलापूरमध्ये जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले. माळेवाडी येथे शुक्रवारी हा विवाह पार पडला. दोन्ही बहिणी आयटी इंजिनिअर आहेत. या दोघीही लहानपणापासूनच मैत्रिणीप्रमाणे राहिल्या आणि आता पुढेही एकत्र राहण्यासाठी लग्न करत आहेत. दोघींनी अतुल नावाच्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक विचारत आहेत की, हे लग्न कायदेशीररित्या वैध आहे का? सध्या पोलिसांनी नवरदेवावर गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुलचा मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय आहे. मुळचा तो माळेवाडी तालुक्यातील रहिवासी आहे. पिंकी आणि रिंकी यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर दोन्ही बहिणी आईसोबत माळेवाडी…

Read More

आपण नेहमी कमी वेळेत लखपती कसे होणार याकडे आकर्षित असतो पण आपण जर बचत केलीच नाही तर कसे लखपती होणार ? यासाठी एक उत्तम योजना आलीय ज्याने तुमचे स्वप्न साकार होणार. अल्पबचत योजना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायच देत नाही तर उत्तम परताव्याची हमी पण देतात. या गुंतवणूक योजनेत तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक योजनेसारखी (SIP) गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक दरमहा केल्यास तुम्हाला काही वर्षानंतर जोरदार परतावा मिळतो. पब्लिक प्रोव्हिडंड फंडमध्ये (PPF) केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करते. पीपीएफ योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेत व्याजदर हा इतर बचत योजनांमपेक्षा अधिक मिळते. ही योजना दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रब्‍बी हंगामासाठी आवश्‍यक असलेल्‍या रासायनिक खतांचा साठा मुबलक आहे. जिल्‍ह्यात सद्यःस्थितीत एक लाख एक हजार ५४३ टन इतका खतांचा साठा असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास शिंदे यांनी दिली. जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, विनोद तराळ उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी शिंदे यांनी खतांच्‍या उपलब्‍धतेबाबत माहिती दिली, तसेच लिकिंग किंवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार असल्‍यास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. खरिपात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता रब्‍बी हंगामावर आशा आहे. रब्‍बी हंगामातील पेरा शेतकऱ्यांनी उशिरा का होईना सुरू केला आहे. अनेक शेतकरी…

Read More