नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत श्रद्धा हत्याकांड झाल्यानंतर देशात शोक व्यक्त केला गेला पण आता पुन्हा दिल्ली एकदा हादरलीय. पश्चिम दिल्लीमध्ये एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुणाचा आहे? याची ओळख पटवणं देखील पोलिसांसमोर आव्हान आहे. कारण सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत तरुणीची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. याप्रकरणाचं गूढ उकलण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात दुर्गंध पसरला होता. त्यामुळे शंका उपस्थित केली जात होती. अखेर एका संशयास्पद सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एक सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशातील भाजपने गुजरातमध्ये निवडणूक एकतर्फी केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे तर यावर ठाकरे गटातील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, गुजरातचा निकाल हा अपेक्षित असून, तिकडे जर ‘आप’सह इतर पक्षांनी युती करून भाजपविरोधात निवडणूक लढवली असती, तर नक्कीच “काँटे की टक्कर” द्यावी लागली असती. पण, दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा, असे काहीतरी झाले असावे अशी लोकांच्या मनात शंका आहे, असे म्हणत आम आदमी पार्टी आणि भाजपचे साटेलोटे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आज हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख गावातील ३५ वर्षीय विक्की रविंद्र कोळी यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी झाला होती. ओळखीचा गैरफायदा घेत विक्की याने अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार घरी सांगितला तर तुझ्या भावाला मारेल अशी धमकी दिली. दरम्यान, पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विक्की रविंद्र कोळी…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक – पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर भीषण अपघात झाला. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघातानंतर एस टी बसने पेट असल्याने जळून खाक झाली आहे. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याचे समजते आहे. नाशिकच्या औरंगाबाद चौफुलीवर घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नाशिक शहरात घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिंदे पळसे टोल नाका…
धरणगाव : प्रतिनिधी तालूक्यातील धानोरे येथील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन सरपंच भगवान आसाराम महाजन यांनी या सप्ताहाचे आयोजन केले असून तर दि ८ रोजी सप्ताह सांगतेला जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभली. यावेळी कीर्तनकार ह.भ.प.गोविंद महाराज पंढरपूरकर यांच्या काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना पालकमंत्री पाटील हे त्यांच्या कीर्तनात मंत्रमुग्ध झाले होते. यानंतर ह.भ.प.महाराज यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाटील यांनी सरपंच भगवान महाजन यांनी आयोजित केलेला धार्मिक कार्यक्रम तालुक्यातील भाविकांसाठी मोठी मेजवानी असल्याचीही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. विहिरीला पाणी लागले कि पाणी भरत असते तसे भगवान महाजन यांचे कार्य सुरूच असते, त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर किरकोळ कारणातून मारहाण केल्याप्रकरणी मारवाड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली होती. यातील फिर्यादी पती व पत्नी हे जखमी असल्याने त्यांनी उपचार घेतल्यानंतर याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. गोकुळ आनंदा बच्छाव (एकतास, ता. अमळनेर) व दुर्योधन निंबा वाघ यांच्यात शेतात जाण्याच्या वहिवाटेवरून वाद सुरू आहे. या वादातूनच २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायतीजवळ बच्छाव हे बैलगाडीने शेतात जात असताना त्यांना आरोपींनी शिवीगाळ करून हातातील काठीने मारहाण केली. तसेच गोकुळ यांच्या पत्नीला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंगही केला. दरम्यान, या मारहाणीत गोकुळ बच्छाव व…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरासह परिसरातील गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत बुधवारी आदेश काढले आहे. पाचोरा शहरासह जवळच्या गावांमध्ये दहशत माजविणारे सलमान बल्लू, पिंजारी (वय २३), शाहरूख शेख लाल शेख (२६) आणि शेख फिरोज शेख नाझीर पिंजारी (३०, सर्व रा. कुर्बान नगर, पाचोरा) यांच्या विरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पाचोरा शहरात शांतता अबाधित राहावी, या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तिघांचा हद्दपारचा प्रस्ताव मंजूर करून तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे.
मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातूनच परक्या लोकांपेक्षा हल्ली जवळच्या लोकांवरचाच अनेकांचा विश्वास उडाला आहे असं म्हटलं तर खोटं ठरू नये कारण असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडलेला पाहायला मिळाला आहे. आपल्या सख्ख्याच मुलानं व सुनेनं आपल्या जन्मदात्या आईची फसवणूक केली आहे. हिंदी-मराठी मालिकांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे सध्या अनेक गुन्हेगारीचे प्रकार पाहायला मिळत आहेत. सध्या पैसा हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे आजकाल लोकांच्या पैशांची फसवणूकही केली जाते आहे. अशा परिस्थितीत आपल्याला परक्या लोकांसोबतच काय पण आपल्या आप्तांशीही कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वत:च्या आईची मुलगा…
मुंबई : वृत्तसंस्था संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री शिंदेंना षंढ हा शब्द वापरल्याने शिंदे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी चक्क राऊत यांना इशाराच दिला आहे ते म्हणाले कि, संजय राऊत नुकतेच साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना बाहेरचे वातावरण सुट होत नाही, असे दिसत आहे. ते जर असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येईल. आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी…
जळगाव :प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदी येथून वाळू वाळूचा उपसा करुन शहरात येत असलेल्या ट्रॅक्टर हे कारवाईच्या भितीपोटी चालकाने भरधाव वेगाने हाकत असतांना पुढे चालणार्या तीन ते चार वाहनांना उडविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी खोटे नगर जवळील वाटीका आश्रमजवळ घडली. यामध्ये पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाल्याने पोलिसांन ट्रॅक्टर जप्त केले आहे. गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर कारवाईच्या भितीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवितात. मंगळवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगावकडे येत…

