Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीस बोलल्या…
    राजकारण

    ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीस बोलल्या…

    editor deskBy editor deskNovember 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांनी नुकतेच मंत्रालयात एका पत्रकार महिलेला कपाळावर टिकली लावली नाही, म्हणून बोलण्यास नकार दिल्यावरून ‘शिवप्रतिष्ठान’चे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर राजकीय स्तरातून मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

    अमृता फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं. महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
    संभाजी भिडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

    संभाजी भिडे यांच्या कृतीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात भिडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘स्त्रीचा दर्जा हा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणार आहे. याबाबत समाजात प्रतिक्रिया उमटत असून, त्या भूमिकेचा खुलासा आपण तत्काळ आयोगासमोर सादर करावा,’ असे आयोगाने भिडे यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने संभाजी भिडे यांना त्यांच्या सांगलीच्या पत्त्यावर ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.