Author: editor desk

उस्मानाबाद : वृत्तसंस्था  राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी. अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा आणि त्यातली सभा उधळून लावू, असा इशारा मनसे नेत्याने दिला आहे.  मुलुंड येथील सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. 1 डिसेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केलं. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी नाव न घेताच केली होती.. यावरून राज्यभरातील मनसे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्याने पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे मनसेवर नाराज असल्याची चर्चा राज्यभर होत होती ते आज पक्ष सोडतील तेव्हा सोडतील असे विरोधकांना वाटत होते पण तसे काही हि आतापर्यत झालेले नाही, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसुन आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर येतात. तर काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच दानवे यांनी माफी मागितली आहे. शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच दानवे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. काय म्हणाले होते दानवे ! सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून यामध्ये नितीन निंबा राठोड (वय-24) व सचिन कैलास चव्हाण (वय-22) दोघ गंभीर जखमी झाले. यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरु आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहे. दरम्यान, या वादाच्या कारणावरुन रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सध्याचे युग दिवसेंदिवस प्रगती करीत असले तरी अद्यापही दिव्यांगत्व रोखणे शक्य नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने जन्माच्या अगोदरपासून अपंगत्व कळते. वेळीच उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगत्व रोखणे किंवा कमी करणे शक्य होते. उडानच्या प्रारंभिक बालविकास केंद्राच्या माध्यमातून हे पुण्यकर्म शक्य होईल, असे प्रतिपादन दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान प्रारंभिक बालविकास केंद्राचे लोकार्पण शनिवार दि.३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी, सोयो सिस्टीमचे किशोर ढाके, के.के.कॅन्सचे प्रमुख रजनीकांत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सातत्याने होत असलेले वादग्रस्त वक्तव्याची मालिका संपताना संपत नाही आहे. महाराजांबद्दल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, असा वक्तव्य त्यांनी केले. लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवरायांबद्दल वादाची मालिका काही खंडीत होत नसल्याने राज्यभर संतापाचे वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एकामागून एक भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं करीत आहेत. राज्यपालांच्या विधानानंतर तर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. त्यावरुनच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक विधान केलं आहे.गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवरायांच्या बाबतीत कोणत्याही ‘मायच्या लाल’ला बोलण्याचा अधिकार नाही. मग कुणीही असो. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो. छत्रपती हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही. ‘मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण राज्यपालांना सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो… चुकीला माफी नाही” असा इशाराच त्यांनी दिलाय. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. शिवरायांचा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  नागपूर येथे महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून शहरातील श्रीराम नगरातील योगेश विजयकुमार चौधरी (वय २१) याचा  संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा तरुण नागपूर येथे डिप्लोमा अभ्यासिकेचे शिक्षण घेत होता. योगेश हा युवक नागपुरातील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तो गंभीर जखमी झाला. सुरक्षा रक्षकांना त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. योगेशच्या मृत्यूची माहिती त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या वडिलांना आल्याने कुटूंब हादरले. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी मदत केली. मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष रवी ढगे, पप्पू पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव पाटील, वासुदेव…

Read More

आपण नेहमी फळांच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न्न्न करीत असतो, संत्री हे फळ अनेकांना आवडते. संत्र्यांचा ज्युस पिऊन अनेक लोक दिवसाची सुरुवात करतात. संत्री हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक संत्री खाल्यानंतर त्याचे साल फेकून देतात.पण संत्रीचे साल न फेकता तुम्ही त्याचा वापर करु शकता. संत्रीप्रमाणेच संत्रीचे साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊयात संत्रीच्या सालाचे फायदे संत्रीच्या सालामध्ये असतात पोषक तत्वे फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते. संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते. तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी खोटेनगरजवळील हॉटेल राधिका समोर घडली. सचिन चंद्रकांत फेगडे (४२, रा. शंकरराव नगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. टँकरचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. शंकरराव नगरात सचिन फेगडे हे पत्नी, मुलगी व भावासोबत वास्तव्यास होते. बांभोरीजवळील एका कंपनीत ते नोकरीला आहेत. शुक्रवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते दुचाकीने घरी निघाले. खोटेनगरजवळील राधिका हॉटेलसमोर ओव्हरटेक करणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते दुभाजकावर आदळल्याने तसेच टँकर त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते.…

Read More