Author: editor desk

माणूस रात्री झोपताना नेहमीच ज्या परिस्थितीतून जात असतो त्याचा विचार करीत असतोय, म्हणून त्याला तशी स्वप्ने पडतात. स्वप्ने आपल्या जीवनातील परिस्थितींवर प्रभाव टाकू शकतात. स्वप्ने आपल्या जीवनाचा आरसा असतो. स्वप्नशास्त्राचे तज्ज्ञ म्हणतात की, अशी काही स्वप्ने असतात, ज्यांचा एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो. आपण अनेकदा पाहिलेली स्वप्ने आपल्या प्रियजनांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करतो. पण, त्या स्वप्नाचे अर्थ आपल्याला कळत नाही. प्रत्येक स्वप्न तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगू नये. जी स्वप्ने तुम्हाला आर्थिक लाभ देतात, ती स्वप्ने जर आपण कोणाला सांगितली तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. कोणती स्वप्ने शेअर करू नयेत हे जाणून घ्या स्वप्नात आई-वडिलांना पाणी देणे स्वप्न…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे सरकार अधिकाळ चालणार नाही. हे सरकार 2023ला पडणार आहे. त्यानंतर राज्यात निवडणुका लागतील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आमच्याकडून जे 40 आमदार गेले. त्यांचा बायोडेटा चेक करा. त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा उड्या मारल्या आहेत. त्यांची तशी फितरतच आहे. सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, असा हल्ला त्यांनी चढवला. यावेळी त्यांनी जळगावचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. चिमण आबांचं वय 73 आहे. त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे (Mumbai News) येणाऱ्या मार्गावर झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने आज पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. याच्या अंतर्गत, अनुसूचित जाती महिला-१; अनुसुचीत जमाती-२ व अनुसुचीत जमाती महिला-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला (विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह) -२ अशा प्रकारे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला-४ असे आरक्षण निघाले आहे. याच्या अंतर्गत, पारोळा येथे सभापतीपद अनुसुचित जाती महिला तर भुसावळ आणि बोदवड अनुसुचीत जमाती तर चोपडा येथे अनुसुचित जमाती महिला असे आरक्षण निघाले…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राज्यातून टिकेचे पडसाद उमटत आहेत. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘राष्ट्रीय पप्पू’ असे राहुल यांना संबोधत त्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे.’ अशी टिका त्यांनी केली आहे. राज्यातील भारत जोडो यात्रे दरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील मंत्रालय परिसरात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक होती. दुपारच्या वेळी या तरुणाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारली. अनेकदा मंत्रालयाच्या इमारतीवरून नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयात आज एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती. हा शेतकरी असल्याचं सांगितलं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता पुढची सुनावणी 28 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहेत. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आजची सुनावणीही लांबणीवर गेली आहे. याच महिनाअखेरीस म्हणजेच, 28 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील 92 नगर…

Read More

नाशिक : प्रतिनिधी  राज्यात हिवाळी सुरु असतांना प्रत्येक परिवार गरम पाण्याने अंघोळ करीत असतो पण हेच गरम पाणी घेणे एका परिवारावर बेतले आहे. दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. यातच तिचा जीव जाण्याची घटना घडली आहे. गंभीररीत्या भाजलेल्या दहा महिन्यांच्या कोवळ्या जीवावर तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. चिमुकलीच्या मृत्यूबाबत कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक येथील गंगापूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आवेरा शुभम इंगळे ही अवघ्या दहा महिन्यांची चिमुकली. आवेराच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयावरील अत्यंत गुंतागुंतीची आणि जिकिरीची शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे शहरातील इतर खासगी रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी असमर्थता दाखवली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रवंजे (ता. एरंडोल) येथील ४८ वर्षीय महिलेला दीड वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी त्यांनी तात्पुरता उपचार करून घेतला. मात्र आता त्यांना त्रास असह्य होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली. गर्भाशयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी त्यांना औरंगाबाद जाण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील एका खासगी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशाराच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला. वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं. वीर सावरकरांचा हा अपमान सहन केला जाणार नाही. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे…

Read More