Author: editor desk

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका शेत शिवारातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका शेतशिवारात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून परिवार मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. तर शेतातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने त्याच्या फायद्यासाठी पळवून नेल्याची घटना दि १४ रोजी घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गणेश वाघमारे हे करीत आहेत.

Read More

धरणणाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चांदसर शिवारातील शेतातून गणेश नारायण भंडारकर(वय ५२) यांची दुचाकी एम.एच.१४ बी.एल.१३७८ क्र्माकाची ते शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता काही अनोळखी इसमाने त्यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुभ हे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतीनिधी  चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका परिसरात बंद घर पाहून चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करीत घरातील तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल घेत पोबारा केला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मेहुणबारे येथील नवेगावातील रहिवासी विमलबाई पुंडलिक निकम हे गावी गेले असतांना अनोळखी इसमांनी दि १४ रोजी मध्यरात्री घरातील लोखंडी दरवाजाचे कडी कोयडा तोडून घरातील गोदरेज कपाटातील १ लाख ५० हजार रुपये रोख तर ५६ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरेश अभिमन काकनदे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  शहरातून धुळेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी ओमनी गाडीने धरणगावकडून चोपड्याकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ओमनी गाडीतील बसलेले सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ घडली. गंभीर जखमीपैकी एकाला जळगावला हलविण्यात आले आहे. तर दुचाकी वरील दोन्ही मयत चोपडा शहरातील रहिवाशी आहेत. ओमनी गाडी क्रमांक-एमएच-१८डब्ल्यू ७९८७ ही सहा प्रवाशांना घेऊन रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने चोपडयाकडून धुळेकडे जात होती. यावेळी कॉन्ट्रॅक्टर असलेले अकसर इरफान काझी (४८) रा. दर्गाअळी चोपडा शेख अनिस शेख जुहूर (४६) रा. मण्यारअळी चोपडा हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव वाहन क्षेत्रातील व्यावसायिक किरण बच्छाव यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांचा जिल्हापेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आधारावर दरोडेखोरांच्या शोधार्थ जिल्ह्यात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सोमवारी रात्री ९ वाजता अजय कॉलनीतील रहिवासी किरण बच्छाव यांच्या घरात सहा ते सात दरोडेखोरांनी बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बच्छाव दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र आरडा-ओरड झाल्यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या पत्नी वेदांती यांचा ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री गरोदर होत असतानाचे सर्वच फोटो व्हायरल होत आहे, तर त्यांची डिलिव्हरी कशी झाली काय झाली हि चाहत्यांना उस्तुकता लागून असते, पण सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा यांनी नुकतच पहिला मुलगा वायू ला २० ऑगस्ट रोजी जन्म दिला. जिथे बहुतांश अभिनेत्रींची सी. सेक्शनने डिलिव्हरी झाली तिथे सोनमची नॉर्मल डिलेव्हरी कशी झाली? असा अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वतः सोनमने सोशल मीडियावर दिलं आहे. सोनमने आपल्या संपूर्ण प्रेग्नंसीचा एक्सपिरीयन्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिनं सांगितलं की, तिला मुल नैसर्गिक पद्धतीने जन्माला घालायचं होतं. म्हणून तिच्या डॉक्टर गौरी मोथा यांच्या मार्गदर्शनात तिनं ‘जेंटल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार, पण धरणगावकरांना पाणी द्या, अशा शब्दात पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी कधी नव्हे ते आताच दबावाखाली काम करत असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे. यावेळी रमेश पाटील, शरद माळी, धीरेंद्र पुरभे, राजेंद्र ठाकरे,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज, सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील दुध संघातील वाद आता वाढत चालला असून या प्रकरणी आ.एकनाथराव खडसे यांनी आज दि १५ रोजी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.खडसे म्हणाले कि, जिल्हा दुध संघात सध्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला तरी आम्ही याला घाबरणार नाही आणि भीकही घालणार नाही. अशा शब्दांमध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. जिल्हा दुध संघाचे एमडी स्वत: तक्रारदार असतांना त्यांना अटक करण्यात आली. तर निवडणुकीत आम्हीच विजय मिळवणार असल्याने हे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुध संघाच्‍या निवडणूकासाठी नियम बदलले गेले आहे. राजकिय दबावाखाली हे नियम बदलले जाताय. सत्‍तेचा दुरूपयोग होत आहे. निवडणूकीत लढायचे असेल तर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ निवडणुकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची नाशिक विभागातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, संजय गरुड आदींनी श्री देवकर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला. राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी 22 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदार संघातून नाशिक विभागाकडून जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची…

Read More