मुक्ताईनगर : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या आमदारांना घेवून पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरु असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील साळवे येथील बाळासाहेबांची शिवसेनेचे विभागिय संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ७५ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध बँकेत असतांना अनोळखी इसमाने रोकड लांबविल्या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिवाजी नगरातील रहिवासी नामदेव शंकर पाटील(वय ७५) हे भडगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेले असतात त्या ठिकाणाहून अनोळखी व्यक्तीने वृद्धाच्या हातातील पिशवीतून ४५ हजार रुपयांची रोकड उडविल्याची घटना दि १६ रोजी भर दुपारी घडली होती, या प्रकरणी भडगाव पोलिसात धाव घेत तत्काळ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.संजय काळे हे करीत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून सेटिंगच्या प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहातील स्वामी समर्थ नगरातील सुरु असलेल्या मंदिराचे बाधकाम ठिकाणाहून गणेश महाजन यांच्या मालकीच्या सेटिंगच्या प्लेटा ४४ नग किमान १७ हजार ५०० रुपये किमतीच्या अनोळखी इसमांनी चोरून नेल्याची घटना दि २० सप्टेबर २०२२ रोजी घडली. या प्रकरणी गणेश महाजन यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी वाढदिवशी अनेक लोक वेगवेगळे संकल्प करीत असतात तर काही लोक वृक्ष लागवडीचा संकल्प करतात तर काही त्यांना जगविण्याचा करीत असतात तर जळगाव शहरातील योगेश वराडे यांच्या १२ वर्षाच्या कन्येने आपल्या वाढदिवसाला वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून यंदा तिने तिसऱ्यांदा वृक्ष लागवड केली आहे. जळगावातील मेहरून तलावाकाठी रमेश पहलानी करा ओके म्युझिकल ग्रूपसोबत झाडे लागवड केली. अक्षराच्या रूपाने सामाजिक कार्यात आज नाही तर गेल्या १ रोजी दिवसापासून म्हणजेच तिच्या ३ वाढदिवसापासून सुरुवात झाली. ती थेट अक्षरा अभ्यासिका पळासखेडे बू!! तालुका जामनेर जिल्हा जळगाव, येथून ती वाटचाल करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले,बरीच मुलं त्याच अभ्यासिकेत बसून शासकीय…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव : आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या एम.फार्मसी विभागाचा निकाल लागला. द्वितीय वर्ष फार्माकोग्नोसी शाखेतून धरणगावातील ऐश्वर्या शाम काबरा 9.93 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात प्रथम आली. धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.आय.राहुलजी खताळ यांनी नेताजी रोड येथे ऐश्वर्या च्या निवासस्थानी जाऊन भेट दिली व तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. सोबत कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, पी.एस.आय अमोल गुंजाळ, गोपनीय अधिकारी मिलिंद जी सोनार, समाधान भागवत, आजोबा रमेश काबरा, वडील श्याम काबरा, आई डॉ.अर्चना काबरा, गोकुळ काबरा, लकी काबरा, इच्छेश काबरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इच्छेश काबरा यांनी केले…
मुंबई : वृत्तसंस्था दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. त्यानुसार त्यांनी मोठी कारवाई केली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला होता. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते. वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती. ‘विविध सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहेत,’ त्यावरुन सीआयडीने ही…
मुंबई : वृत्तसंस्था कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना काही सूट देण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा तिथं परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रमामधील कपात याचा समावेश होता. मात्र, यंदा या सवलती रद्द करण्यात येणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल, तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना आता…
मुंबई : वृत्तसंस्था पहाडी राज्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे दिल्लीसह आसपासच्या राज्यांमध्ये थंड हवा पाहायला मिळणार आहे. राजधानी आणि परिसरात तापमानात घसरण सुरूच राहणार आहे. याशिवाय 24 तासांत राज्याच्या तापमानात विशेष बदल होणार नाही. देशातील काही भागात मागील काही महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. या इशाऱ्या नुसार आता देशातील तब्बल 12 राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या पश्चिमेकडील राज्यांसह 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे. तर 16 नोव्हेंबरपासून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र…
शहराचे वाढत असलेले प्रदूषण अन् त्यात तुम्ही जर धूम्रपान करत असला, तर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांपासून आताच सावध व्हायला हवे. सीओपीडी अर्थात क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीससाठी धूम्रपान हा सर्वाधिक परिणामकारक घटक असून, बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका अधिकच वाढत आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे. श्वसनाचा एक दीर्घकालीन आजार, ज्यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या श्वसननलिकांचा दाह होतो आणि त्यांना सूज येते. यामुळे श्वासनलिका आकुंचन पावतात आणि श्वासोच्छवासात (प्रामुख्याने उच्छवासात) अडथळा निर्माण होतो. अर्थातच फुप्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडची देवाणघेवाण करण्याची क्षमता कमी होते. लक्षणे दीर्घकालीन चालणारा खोकला काम केल्यावर धाप लागणे लवकर थकवा येणे परिणाम रुग्णाची कार्यक्षमता कमी…

