Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात घरातून महिलेचे सोन्याची चोरी केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने धरणगाव तालुका हादरून गेला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रेल या गावातील रहिवासी असलेल्या निलेश पाटील(वय ३४) यांच्या आजीच्या घरावरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेली असतांना अनोळखी चोरट्याने महिलांचे डोक्यावर व तोंडावर दुखापत करीत व कान कापून कानातील ८ ते १० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना दि.२९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी गणेश बुवा हे करीत…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या १००व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत. मोदींनी स्वतः ट्विट करून…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा घेऊन गेलेल्या राज्यातील हजारो संगणक परिचालक यांच्या मदतीला आमदार मंगेश चव्हाण धावून आल्याचे बघायला मिळाले. नागपूर येथे दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनात शासनाकडून कुठेलही ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेणार नाही अशी भूमिका राज्यभरातून आलेल्या संगणक परीचालकांनी घेतली होती. रात्र होऊनही त्यांनी आंदोलन स्थगित न केल्याचे तसेच सदर आंदोलनात राज्यभरातून महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी ही बाब ग्रामविकास मंत्री नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन विरोधक व सत्ताधाऱ्यामध्ये खडाजंगीमध्ये होत असतानाच आज धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर या प्रकरणी तुनिषाच्या प्रकरणी शिझानला अटक करण्यात आली आहे. तसेच तो तिचा छळ करत होता, असे आरोपही करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई येथे २४ डिसेंबर रोजी एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवन संपविले होते. याप्रकरणी अभिनेता शिझान याच्यावर तुनिषाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मृत तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आज मी तुनिषा शर्माच्या आईशी अर्धा तास बोललो. मुलीच्या बाबतीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची हत्या करण्यात आली आहे. मुळची झारखंडची असणाऱ्या रिया कुमारीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच चर्चेत असते. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  या घटनेनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ती पती प्रकाश कुमारसोबत प्रवास करत होती. दरम्यान काही अज्ञातांनी तिच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये तिचा मृत्यु झाला आहे. रियाच्या पतीकडून बळजबरीनं पैसे घेण्यासाठी त्या गुंडांनी झटापट केल्याचे दिसून आले आहे.पतीला गुंड मारहाण करत असतानाच त्या हल्लेखोराची गोळी रियाला लागली आणि त्यात तिचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माचे प्रकरण वादात असताना त्यानंतर घडलेल्या रियाच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील कट्टर विरोधक असलेले शिंदे व ठाकरे गटातील सातत्याने नेहमीच विविध आरोप प्रत्यारोप समोर येत आहे. तर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या हालचारी सुरू झाल्याचे समजते. शिवसेना भवन शिंदे गट लवकरच ताब्यात घेईल, असा दावा आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय. त्यामुळे या चर्चेला वेग आलाय. शिंदे गटाने शिवसेना भवन ताब्यात घेण्याची हालचाल केली, तर मुंबईत राजकीय वातावरण तापू शकते. येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय खेळ्या खेळल्या जात आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचा एकछत्री अंमलय. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर काल…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकांची महाविद्यालय प्रशासन आर्थिक शोषण करत असल्याचा अर्ज येथील एका प्राध्यापकांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील कुलसचिव यांच्याकडे केला आहे. दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, नवलभाऊ कृषि महाविद्यालय अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सन 2011नंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील तज्ञ कमिटी मार्फत सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया नाही. सन 2011मधील भरती प्रक्रिया मधील दोन सहाय्यक प्राध्यापक फक्त आज सेवेत त्यांचे देखील विद्यापीठकडून approval मिळालेले नाही. कृषि विद्यापीठातील सक्षम अधिकारी व संस्थाचालक हे मिळून संगत मताने आर्थिक शोषण करीत आहेत. सन 2011पासून कुठलाही वेतन आयोग लागू न करता मनमानी पद्धतीने वेतन…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  शेतकऱ्यावर नेहमीच संकट येत असतात पावसाळ्यात निसर्गाचे संकट तर हिवाळ्यात चोरट्याचे संकट दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी चोरट्यांचे संकट मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आढळून येत आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील एका शेतकऱ्याचा कापूस व गहू याची चोरी केल्याची घटना उघडतेस आले आहे याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील गोरमाळा शिवारात शेती असलेले सुपडू संतोष पाटील यांच्या शेतातील पत्राच्या खोलीतून अनोळखी चोरट्यांनी खोलीचा कडी कोणाला तोडून खोलीत असलेले 17 क्विंटल कापूस व ७ हजार ५०० रुपये किमतीचा गहू असा एकूण १,३४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे घटना दिनांक 28 रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जामनेर पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने घरफोडी करीत ३५ हजाराचा एवस लंपास केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, निमखेडी शिवारातील अनुपम सोसायटी अष्टभुजा मंदिराच्या गेट जवळील रहिवाशी गणेश अशोक पाटील (वय ४५) यांच्या घरात दिनांक ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर यादरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातून ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व २२ हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ३५ हजाराचा मुदेमाल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात…

Read More