Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकमालक व चालक असे दोघे फरार झाले आहेत. या प्रकरणी अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, विप्रो कंपनीतील साबणाचा माल तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीकडून गाडीचा (क्र. आरजे ११ जीए ८१३८) चालक व मालक यांच्या मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. ४ जानेवारी रोजी या वाहनात विप्रो कंपनीतून १० टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टकडे देण्यात आला. ९ जानेवारी रोजी गाडी तुमकुर येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, वाहन त्या ठिकाणी पोहोचलेच नाही. चालक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  कौटुंबिक वादातून तीन जणांनी धारदार शस्त्रानं तरुणाचं प्रायव्हेट पार्टच कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवली गोळवली परिसरात घडलेल्या एका घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीमधील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून मोठं भांडण झालं. याच भांडणातून तीन तरुणांनी रागाच्या भरात एका तरुणाचं लिंग कापल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित तरुण संजय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर आज मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. यावेळी कागल शहरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात होणारा ईडीची कारवाई ही सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. त्यावर आधी भाजपचे आमदार निलेश राणे यांनी उत्तर दिलं होतं. तसेच कशाला थयथयाट करता असा सवाल केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपलं मत मांडलं आहे. गुलाबराव पाटील यांनी, ईडी ही एक वेगळी एजन्सी असून ईडीचे वेगळे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आज ईडी व आयकर विभागाने छापेमारी केल्याबाबत हसन मुश्रीफ यांनीही माध्यमांकडे पुष्टी केलील आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षी अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तींनी दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे को मुकुंद पाटील हे करीत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू जखमी झाले आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 6. 30 च्या सुमारास बच्चू कडू रस्ता क्रॉस करत होते. त्या सुमारास समोरून येणाऱ्या एका दुचारीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली, यामुळे बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. याबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”, असे ट्वीट बच्चू कडू यांनी…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  येथील अमळनेर रोड अशोक नगर भागातील बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोने लंपास केले. त्याचबरोबर भोकरबारी तालुका पारोळा येथे देखील चोरीची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि,  अशोकनगर येथील रहिवाशी समाधान बापू भवर (मराठे) हे बाहेरगावी गेले होते. ९ जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील साडेचार ग्रॅम सोन्याचा नेकलेस तर १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार करण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पुढील तपास स.फौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  धुळे रोडवरील उदेसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी दुपारी ३:३० ते दि. ८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमलबाई अमरसिंग पाटील (वय ७२, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी शहर पोलिसांत मंगळवारी फिर्याद दिली असून, त्यानुसार त्या व त्यांचे पती नाशिक येथे दि. ३ रोजी कामानिमित्त मुलाकडे गेले होते. जाताना घराला कुलूप लावले होते. तेथून दि. ८ रोजी रात्री आठ वाजता घरी आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दाराचे लोखंडी कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसराच्या  मुख्य रस्त्यावर १७ वर्षीय युवतीचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रिंग रोड परिसरात दिनांक १० रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका ठिकाणी १७ वर्षीय युवती जात असताना तिच्या समोरून येणाऱ्या संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत (वय ४२) रा.बिबा नगर याने युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. किशोर पवार हे करीत आहे

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयाचा कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी  की, तालुक्यातील लोन शिवारातील शेतकरी दिनेश निंबा साळुंखे यांचे शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयांचा कापूस यांनी एकत्र करून ठेवलेला होता. दिनांक ९ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कापसाची पाहणी करून घरी गेले होते. त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील सालदार संतोष पाटील यांनी त्यांना फोन करून सांगितले की शेडच्या मागील दरवाजा उघडा असून व ठिकाण त्या ठिकाणी कापूस पडलेला दिसून येत आहे. याबाबत त्यांनी लागलीच शेतात धाव घेत…

Read More