Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत
    क्राईम

    प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत

    editor deskBy editor deskDecember 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    आठ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या मुलीच्या प्रियकराने तिच्या पतिवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली. हि घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा ते दूई दरम्यान घडली. याबाबत रात्री उशिरा नोंद करण्यात आली असून प्रियकरासह पत्नी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

    याबाबत मध्यप्रदेशातील अंबाडा तालुका नेपानगर जिल्हा बऱ्हाणपूर येथील अरविंद रवींद्र सुलताने (वय 23 वर्षे ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे की , गेल्या आठ दिवसापूर्वी कुऱ्हा काकोडा येथील वर्षा बघे या मुलीशी लग्न झाले होते त्यानंतर काल चार रोजी फिर्यादी अरविंद सुलताने हा त्याच्या पत्नीला अंबाडा येथे सासरी घेऊन जात असताना रस्त्यातच पूर्णाड फाटा ते दूई दरम्यान त्यांची मोटार सायकल बिघाड झाल्याने ते त्या ठिकाणी थांबले. त्या ठिकाणी वर्षा बगे हिचा प्रियकर शुभम भिसे हा आला आणि त्याने अरविंद सुलताने याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला.त्यात पती अरविंद सुलताने हा गंभीर जखमी झाला असून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.दरम्यान शुभम भिसे व वर्षा बगे यांना अटक करण्यात आली आहे.तपास पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.