Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या आठवड्याभरात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून म्हणजेच पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीचे दर तेजी दिसून आली तर आज सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर आज स्थिर आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,290 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 718 रूपये आहे. चेन्नई – 57,380 रुपये दिल्ली – 56,440 रुपये हैदराबाद -56,290 रुपये कोलकत्ता – 56,290 रुपये लखनऊ – 56, 440 रुपये मुंबई – 56,290 रुपये नागपूर -…

Read More

नात्यातील अविश्वासमुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीला राग इतका अनावर झाला की त्याने दोन वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही. हि घटना संभाजी नगर येथे घडली आहे. चारित्राच्या संशयावरून संभाजीनगरच्या कांचनवाडीत पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला आहे. रात्री दोनच्या सुमारास पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या बाळाचा दोरीने गळा आवळला आणि त्यांना संपवलं. या घटनेनंतर आरोपी पती सकाळपर्यंत घरातच थांबला होता. त्यानंतर सकाळी सातारा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पत्नी आणि मुलाच्या हत्येची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलली असून पुढील तपास सुरु केला…

Read More

गेल्या महिन्यापासून नाशिक शहरालगत होणाऱ्या अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नाही. आजही त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १3 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बस मधील प्रवासी हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत. या बस मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. एकूण 29 लोक या गाडीत होते अशी माहिती समोर आली आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहितेने तीन महिन्यापूर्वी आठ वर्षीय मुलीसह कळमसरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मारवड पोलिसांनी तीन महिने चौकशी केली. अखेर सोमवारी एकाच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेने मुलीसह आत्महत्या करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. कळमसरे-नीम रस्त्यावरील सबस्टेशनजवळ भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत 4 ऑक्टोबर 2022 रोजी नीम येथील विवाहितेने आठ वर्षीय मुलीसह आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन महिन्यानंतर अशोक गटलु कोळी (रा. निम, ता. अमळनेर) याच्या विरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील पुणे शहरात दिवसेदिव गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला अनेक दिवस पुणे शहरात राहावे लागणार असल्याने ती भाड्याने रुम पाहत होती. त्यावेळी एका इसमाने तिला भाड्याने रूम दाखविण्याचा बहाणा करुन तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत दुपारी घडली आहे. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. संजय बाजीराव भोसले (वय 52, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले याला उरुळी कांचन येथून अटक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  1993 प्रमाणे मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत सवाल केला आहे की, अशा घातक गुन्हेगार, समाजकंटकांना बळ कसे मिळते? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही ‘जागर मुंबई’ मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय. आम्ही स्वार्थासाठी ‘मशाल’ पेटवलेली नाही आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, 1993 मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार. त्यानंतर मुंबईमध्ये जातीय दंगली होणार, असे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली असून या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असते. वारकरी तत्वज्ञान हे खर्‍या अर्थाने समाजाला दिशादर्शक असून नवतरुणांनी आपले जीवन समृद्ध आणि निर्व्यसनी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार अंगी बनायला हवे. आज समाजात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होत असतांन, वारकरी संप्रदायाचा विचार हाच समाजाला तारू शकतो असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मा.ना. गुलाबरावजी पाटील यांनी सप्ताह समारोप प्रसंगी सप्ताहाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे आश्वासित केले.* पाळधी येथील सप्ताहाची सांगता आज ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.८ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाषणात त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं तेव्हा शिंदे गटाचे आमदार आपल्यासोबत कसे आले याबाबत थोडक्यात भाष्य केलं. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. “आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आम्ही…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात चोरट्यांनी घरफोडी करीत हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील माळीवाडा पिंप्री गल्लीतील रहिवासी असलेले साजिद खान रशीद खान यांच्या घरातून दिनांक ७ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दहा मोबाईल 52 हजार रुपये किमतीचे लंपास केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.संजय पाटील हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आकाशवाणी चौकात कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेली माहिती अशी  कि, महाबळ परिसरातील सुरेशनगर येथे विनोद मधुकर भावसार (४८) हे दुपारी आकाशवाणी चौकातून महामार्गावरून दुचाकीने जात असताना (एम.एच.१९ बी. एच. ००२३) या क्रमाकांच्या कारने धडक दिली. यात ते जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. याप्रकरणी विनोद भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Read More