Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ नवरदेवाची झाली चौकशी ; धक्कादायक माहिती आली समोर !
    क्राईम

    ‘त्या’ नवरदेवाची झाली चौकशी ; धक्कादायक माहिती आली समोर !

    editor deskBy editor deskDecember 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था 

    दोन दिवसा आधीच राज्यातील एका विवाह सोहळा मोठा चर्चेत आला होता. दोन नवरी व एक नवरदेव असा विवाह सोहळ्याचे व्हिडीओ राज्यात प्रंचड व्हायरल झाले होते. पण त्यानंतर नवरदेवावर गुन्हा दाखल झाला होता आता नवरदेवाची चौकशी झाली असता मोठी माहिती समोर आल्याने वधू पक्षाने कपाळाला हात मारला आहे.

    मुंबईच्या जुळ्या बहिणींशी या तरुणाने लग्न केलं आणि अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागणार आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.