नांदेड ; वृत्तसंस्था आजीजवळ शिक्षणासाठी राहण्यासाठी आलेल्या एका सातवीतील चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली होती. तर या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान आता यावर न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून, न्या. आर. एम. पांडे यांनी आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई पुण्यात राहत होते. त्यामुळे मुलगी ही आजीजवळ राहून शिक्षण घेते. दरम्यान 29 जानेवारी 2010 रोजी पीडित मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुलीची आजी ही दळण आणण्यासाठी गिरणीवर गेली…
Author: editor desk
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात नाशिकसह काही जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ दि.१३ रोजी शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते…
राज्यातील शेतकरी हिवाळ्यात थंडीच्या संकटामुळे दुहेरी संकटात सापडला आहे. वाशिम जिल्ह्यात हळद पिकांवर करपा रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. दुसरीकडे, राज्यात दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे तुरीचे पीक धोक्यात आले आहे. राज्यातील बदलत्या हवामानामुळे हळद पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे . सध्या महाराष्ट्रात तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुरीच्या उत्पादनात महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. दुसरीकडे, तेलंगणात तुरीचे सर्वाधिक उत्पादन होते. सध्या राज्यातील वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. हळद…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील महिलेची नापतोल ऑनलाइन शॉपिंग या कंपनीकडून चार चाकी लकी ड्रॉमध्ये लागल्याचे कुपन पोस्टाने पाठवून त्याच्यावर विविध चार्जेसच्या नावाखाली तब्बल ४ लाख ८० हजार २४२ रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील नवी पेठ परिसरातील रहिवासी असलेल्या तिलकपुले यांना नापतोल ऑनलाइन शॉपिंग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉ मध्ये लागल्याचे कुपन त्यांच्या राहत्या घराच्या पोस्टावर पत्त्यावर पाठवून त्यातील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमूद केले होते. या क्रमांकावर तिलकपुरे यांनी संपर्क साधला असता. त्यांच्यासोबत नितीनकुमार सिंग यांनी संभाषण करीत…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एका २३ वर्षीय युवक काम आटोपून आपल्या घरी रात्रीच्या सुमारास जात असतांना एकाने त्याला अडवीत चाकूचा लावत त्याला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भिलवाडा येथील रहिवासी असलेल्या सचिन सुनील सोनवणे (वय २३) हे दि.१० जानेवारी रोजी आपल्या दुचाकीने भानखेडा ते बोदवड रोडने घरी जात असतांना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वसंता अशोक सोनवणे (रा. भिलवाडा) याने त्याच्या हातातील काठी मारत सचिनची दुचाकी रोडावर थांबविली. सचिन यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील १ हजार ५०० रुपये जबरदस्ती काढून घेतले आणि तेथून पळून गेला. या…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्याभरापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतीच समोर आलेली बातमी हि नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. 22 वर्षीय तरुणाने 60 वर्षीय वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यातील पीडित महिलेने अत्याचार केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून उपनगर पोलीसांनी साहिल नाना आवारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार, जीवे ठार मारण्याची धमकी असा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला अर्धांगवायुचा झटका आलेला होता. पीडित वृद्ध महिला ही पत्र्याच्या शेडमध्ये एकटीच राहते. तिला चालताही येत नाही. तीची सर्व देखभाल भाऊ आणि मुलासह पत्नी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथे नुकत्याच झालेल्या BRM सायकलिंग स्पर्धेत भुसावळच्या प्रिया रवी पाटील यांनी जळगाव ते भोकर परत जळगाव व तेथून जळगाव ते घोडसगाव परत रिटर्न जळगाव असे २०० किलो मीटरचे अंतर अवघ्या १२ तासात पूर्ण करून कौतुकास्पद कामगिरी केली. भुसावळ शहरातील सेंट्रल स्कूल मधील शिक्षिका असलेल्या प्रिया रवी पाटील यांना लहानपणापासूनच सायकलिंगची आवड आहे. हा छंद जोपासत त्यांनी नोकरी व कौटुंबीक जबाबदारी देखील सांभाळत त्यांनी सायकलिंगचा सराव सुरू ठेवला. आज छंद जोपासण्यात तुमच्या आई-वडील त्यांच्या कुटुंबाने देखील प्रिया पाटील यांना प्रोत्साहित केले. याच आवडीतून प्रिया पाटील यांनी जळगाव येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी Audax India Randonneur (AIR)…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटासोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची चर्चा सुरु असतानाचा राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात ११ रोजी मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र,…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाची टेलिग्राम आयडी होऊन तब्बल तीन लाखात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील मराठी गल्लीत रहिवासी असलेले मूर्तुजा अहमद शेख इसहाक यांची एका महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एका टेलिग्राम अँप वर एका नंबर वरून पैसे गुंतविण्याचे सांगून त्यात त्यांना कमिशन मिळेल असे भासवत त्यांच्याकडून तब्बल ३ लाख १० हजार ८६४ रुपये स्वीकारून त्या बदल्यात कुठलेही कमिशन न दिल्याने त्यांनी कस्टमर केअर मोबाईल नंबर वर फोन करून पैशांची मागणी केली असता पैसे न करता संबंधित तरुणाची फसवणूक झाल्याने त्यांनी लागलीच…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील एका २९ वर्षीय महिलेस संशयित आरोपीने पहिली पत्नी असतानाही तिच्यासोबत लग्नाचे आमिष देत अत्याचार केल्या प्रकरणी सात जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय महिलेस तब्बल पाच वर्ष लग्नाचे आमिष देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत त्या अत्याचारातून तीन अपत्य झाल्याने त्या महिलेस पहिली पत्नी असल्याचे समजल्यावर तिची फसवणूक करीत तिच्याशी कटकारस्थान रचून सात जणाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.

