Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी  जिल्ह्यातील गेल्या काही दिवसापासून असा एक दिवस नाही कि महिलेवर किवा अल्पवयीन मुलीवर अन्याय होत नाही रोज अशा घटना घडत असतांना नुकतीच एक घटना समोर आली आहे. मतीमंद तरुणीवर अज्ञात इसमाने तिच्यावर अत्यचार करीत तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. एका शेतमजुरी करणा-या मतीमंद तरुणीवर झालेल्या अत्याचारातून तरुणी तिन महिन्यांची गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा येथे शेतमजुरी करणारे कुटूंब शेतात जात होते. दरम्यानच्या कालावधीत मतीमंद तरुणी घरात एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अज्ञाताने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेद हीला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती. आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ज्याच्या घरी घरफोडी झाली होती, ते अटकेतील महिलेचे मामेभाऊ होते, मामेभावाकडे मोठ्याप्रमाणावर दागिणे व रोकड असल्याची माहिती महिलेने तिच्या पतीला व पतीच्या मित्रांना दिली होती. त्यानुसार महिलेसह इतर चौघांनी नियोजनबध्द रितीने ही घर फोडी केल्याचे तपासात समोर आले असून संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीपैकी १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील भाजप पक्ष जरी देश पातळीवर मोठा झालेला असला तरी पक्षातील नाराज असलेले नेते प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर असलेली नाराजी उघडपणे बोलून दाखवीत आहे. यावर आता ठाकरे गट भाजप मधील नाराज नेत्यासाठी पक्ष प्रवेशाची ऑफर देत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. माध्यमांना ते म्हणाले की, पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय. मुंडेमुळे भाजप वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते त्यावर मला बोलायचे नाही. सुनील शिंदे खूप छोटे आहे पण त्यांचे उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. पंकजा मुंडेंना मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. माझी इच्छा आहे…

Read More

पुणे  : वृत्तसंस्था  शाळकरी मुलाने जुन्या भांडणातून १५ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नगर रोडवरील वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणाऱ्या एका पालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गलांडे नगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलाचं एका मुलाशी भांडण झालं होतं. तक्रारदार यांचा मुलगा परिसरात असलेल्या मदर तेरेसा शाळेतून चालत घरी जात होते. बस स्टॉपवर बसले असताना शाळकरी मुलगा आणि त्याचे तीन मित्र या बस स्टॉपवर आले. त्यावेळी त्या मुलांनी तक्रारदाराच्या मुलाना शिवीगाळ केली आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मॉडेल उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. वाघ म्हणाले कि, महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या ‘माझ्यासोबत गावा-गावातील जनता आहे. मी अनेक जिल्ह्यांमध्ये जाते,…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था  उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाईव्हवर सरकार अडीच वर्षे चाललं, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. फक्त हनुमान चालिसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला 13 दिवस या उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेबांचे विचारच जर त्यांच्या घरात ठेवले नाहीतर त्यांचं काय होईल? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या, ” सत्तासंघर्ष सध्या सुरु आहे. सत्ताचा काय संघर्ष आहे? जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत, ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांनाच धनुष्यबाण मिळेल असा विश्वास आहे. माझा देवावरचा विश्वास, हनुमान चालिसावर विश्वास आहे. बाळासाहेबांना…

Read More

धरणगाव :  प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्नेहसंमेलन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे. स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात. त्यांना विविध क्षेत्रात आवड निर्माण होते सुजाण नागरिक तयार होतात.विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते बाल कवी ठोंबरे विद्यालय आयोजित आनंद तरंग स्नेह संमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे हेमालालकाका भाटिया हे होते. आज धरणगाव येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षचिन्हाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना नक्की न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, यावर निकाल देताना एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे. असे मत यावेळी बोलताना रामदास कदम यांनी व्यक्त केले. ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरूच आहे. आता या वादावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “फॅशन करावी, फॅशनला मोठा वाव आहे. फॅशन कुठेही करू शकता, पण कुठेतरी एक मर्यादा असते. प्रोफेशनल आणि रिअॅलिटी यात फरत आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. उर्फीने हे समजून घेतलं पाहिजे. सगळेच जण या वादात उतरले आहेत, पण रबर ताणला की तुटतो. त्यामुळे तो तुटायच्या आता यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. उर्फीला समजवायला हवं.” त्याचबरोबर उर्फीच्या या गोष्टीचं समर्थन करत नसल्याचंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. उर्फी जावेद तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी करत आहे,…

Read More