Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यसभेसाठी नवनीत राणांचे लॉबिंग? सुनेत्रा पवार-फडणवीस भेटींनी चर्चांना उधाण
    जळगाव

    राज्यसभेसाठी नवनीत राणांचे लॉबिंग? सुनेत्रा पवार-फडणवीस भेटींनी चर्चांना उधाण

    editor deskBy editor deskJune 7, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभा जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सलग राजकीय भेटींमुळे उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भेटीनंतर पुन्हा एकदा नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

    या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशी उमेदवारी मिळाल्यास त्यांना भाजपशी असलेले राजकीय समीकरण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे.

    दरम्यान, या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नावही चर्चेत आहे. मात्र उमेदवारीबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस एखादे धक्कातंत्र वापरणार का, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असल्याने आता शेवटच्या क्षणी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ; एलपीजी सिलिंडर ८९ रुपयांनी महागला

    June 7, 2026

    भीषण अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू : स्कॉर्पिओ चालकाला अटक

    June 7, 2026

    भर रस्त्यावर तरुणीचा विनयभंग : गुन्हा दाखल !

    June 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.