जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जात असलेल्या तरुणीला आवाज देवून थांबवून तिचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ५ जून रोजी जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. ५ जून रोजी दुपारच्या सुमारास ही तरुणी रस्त्याने जात होती. यावेळी संशयित गोपाळ कोळी याने तरुणीला आवाज देवून थांबवले. त्यानंतर तिचा हात पकडून विनयभंग केला. घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय कोळी हे करीत आहे.



