यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, गजानन दामू भोळे (वय-५५) रा. पाडळसा ता. यावल ह.मु. अंबरनाथ, मुंबई हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पाडळसा येथे लग्न असल्याने ते अंबरनाथ येथून गावाला रविवारी ८ मे रोजी नातेवाईक यांच्याकडे विष्णू बाळू भोळे यांच्या घरी आले होते. लग्न असल्याने लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी न्हावी हा बुधवारी ११ मे रोजी सकाळी विष्णू भोळे यांच्या घरी आले. त्यावेळी आवाज दिला असता आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता त्यांना…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
मुक्ताईनगर प्रतिनिधी । उज्जैनकडून शेगावकडे जाणारी बस आज सांयकाळी कर्की फाट्यावर उलटल्याने वाहक हा जागीच ठार झाला असून १५ जण जखमी झाले असून दोन गंभीर जखमी झाले आहे. याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशातील उज्जैन येवून शेगावला जाणारी मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस क्रमांक (एमपी १३ पी १३४३) ही आज सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळून जात असतांना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलट्या दिशेने मागे जात थेट शेतात जावून उलटली. यात अपघातात वाहक हा जागीच ठार झाला आहे. तर १५ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेल्या रूग्णांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात…
जळगाव प्रतिनिधी । रामदेववाडी येथील एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र ममतू राठोड (वय-२७) रा. रामदेव वाडी ता. जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १० मे रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएक्स ६१७९) पार्क करून लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिलींद सोनवणे…
जळगाव – प्रतिनिधी । तालुक्यातील तरसोद विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत अर्ज बाद करून फसवणूक केले. तसेच खान्देश अर्बन को.ऑप सोसायटी यांच्या नावाने दिलेला थकबाकीचा खोटा दाखला यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी किशोर पाटील, पंकज बोरोल यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नशीराबाद येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकुण ७३ हजार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत सोमवार ९ मे रोजी दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रामलाल चौबे (वय-६८) रा. नशिराबाद ग्रामपंचायत जवळ, नशिराबाद हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. काही कामाच्या निमित्ताने ते बाहेरगावी ६ मे ते ८ मे दरम्यान घर बंद करून गेले होते. घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे -चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ८ मे मे रोजी हेमंत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात बाहेरुन एक टोळक्याने दुसर्या कैद्यावर हल्ला चढविल्याने रुग्णालयात तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सोमवारी ९ मे रोजी जिल्हापेठ पोलीसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक ९ मध्ये कैदी वार्डात दशरथ बुधा महाजन रा. एरंडोल व सतीष मिलिंद गायकवाड रा. आंबेडकरनगर यांच्यासह आणखी तीन संशयीत उपचारासाठी दाखल झाले होते. रविवार असल्याने या संशयीतांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सतिश गायकवाड या कैद्याने दशरथ महाजन यांच्या कुटुंबियातील महिलेची छेड काढली. यातून त्या दोघांमध्ये वाद झाला…
धरणगाव प्रतिनिधी गौरव पाटील। तालुक्यातील साळवा येथे वाहनाला अडवून चालकासह एकाला टोळक्याने बेदम मारहाण करून जबरदस्तीने पैसे हिसकाविल्याची घटना पहाटे घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहुल सुनिल शिरसाठ (वय-२४) रा. धनगर गल्ली ता. चोपडा हे खासगी वाहन चालक आहेत. सोमवारी ९ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ते कालू उखा चव्हाण यांच्या सोबत जामनेर येथील गुरांच्या बाजारात गुरे विक्री करण्यासाठी (एमएच १९ सीवाय ६९८४ ) ने जात होते. चोपडा ते धरणगाव दरम्यान साळगाव गावाजवळ १० ते १२ जणांनी रस्त्यावर वाहन आडवे लावून मेहुल शिरसाठ यांचे वाहन अडविले. मेहूल आणि कालू…
नशिराबाद पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील २५ तरूणीला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना ५ मे रेाजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची अळी येथील रहिवासी सुचिता सचिन चौधरी (वय-२५) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ मे रोजी दुपारी ३ वाजता घरी असतांना किरकोळ कारणावरून हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवेले रा. खालीची अळी,. नशिराबाद ता.जि.जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी तरूणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हात शिवसेना संपर्क अभियान यासंदर्भात अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जळगाव जिल्हात शिवसेना संपर्क अभियान 25 ते 29 मे 2022 दरम्यान होणार आहे. या अभियानाच्या नियोजनाबाबत आपल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक 6 मे 2022 गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता अजिंठा रेस्ट हाऊस जळगाव येथे पार पडली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळेस जळगांव जिल्हातील भडगांव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा येथील शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रावेर लोकसभा विद्यार्थी अध्यक्षपदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या आदेशाने रावेर लोकसभा विद्यार्थी अध्यक्ष पदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा निवडीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक् रवींद्रभैय्या पाटील, गुलाबरावजी देवकर, सतिष आण्णा पाटील, राजेश पाटील, राजेशदादा वानखेडे,विद्यार्थी अध्यक्ष भूषण भदाणे,परेश कोल्हे कुणाल पवार,रोहन सोनवणे,यांनी अभिनंदन केले.

