Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली; वाहक जागीच ठार
    क्राईम

    चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली; वाहक जागीच ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMay 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर प्रतिनिधी । उज्जैनकडून शेगावकडे जाणारी बस आज सांयकाळी कर्की फाट्यावर उलटल्याने वाहक हा जागीच ठार झाला असून १५ जण जखमी झाले असून दोन गंभीर जखमी झाले आहे.

    याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशातील उज्जैन येवून शेगावला जाणारी मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस क्रमांक (एमपी १३ पी १३४३) ही आज सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळून जात असतांना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलट्या दिशेने मागे जात थेट शेतात जावून उलटली. यात अपघातात वाहक हा जागीच ठार झाला आहे. तर १५ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    जखमी झालेल्या रूग्णांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.