Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त धरणगाव जळगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी जळगाव : जिल्ह्यात सध्या पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व विशाल देवकर यांनी उतरावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याच बरोबर सर्वशक्तीनिशी कार्यकर्ते त्यांच्यासाठी मैदानात उतरतील, अशी ग्वाही देखील कार्यकर्त्याने दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर यांचा शनिवारी (दि. १८) वाढदिवस होता. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. याबाबत विशाल देवकर यांनी…

Read More

धरणगाव, प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. विजयी झालेल्या उमेदवारांमधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडीसाठी आज शुक्रवार १७ जुन रोजी सकाळी विविध कार्यकारी सोसायटी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गोकूळ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी निर्मलाबाई पाटील, विमलबाई पाटील, गणेश पाटील, छगन पाटील , कैलास पाटील, रवींद्र पाटील, मुरलीधर पाटील,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात 57 वर्षे महिलेवर अतिजोखमीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. यासाठी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी देवकर रुग्णालयाचे आभार व्यक्त केले आहेत. धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील श्रीमती सुनंदाबाई गोपीचंद पवार यांना गेल्या काही वर्षांपासून दृष्टीदोष होता. त्यामुळे त्यांना त्या डोळ्याने सर्वकाही अंधुक दिसत होते. त्यासोबतच त्यांना चालताना धाप लागणे, हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया ही अतिजोखमीची ठरणार होती. अशातच त्यांच्या कुटुंबीयांना देवकर रुग्णालयात सवलतीच्या दरात होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी त्यांना सोबत घेत देवकर रुग्णालय गाठले.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील श्रीराम मंदिर संस्थातर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा साजरा करण्यात आली. विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूर करिता श्री संत मुक्ताबाई राम पालखी पायी वारी काढण्यात येते.सोमवारी १३ जून रोजी जुने श्रीराम मंदिर येथून पालखी निघाल्यानंतर शहरातील संत अप्पा महाराज समाधी मंदिरातील मुक्कामानंतर मंगळवारी १४ जून रोजी सकाळी ८ वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात, तसेच विठ्ठल रुख्मिणी, विठोबा रखुमाई, जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोष्यात पालखीचे निघाली. ही पालखी पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी, डिमार्ट, मेहरून बगीचा, जैन हिल्स मार्गे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ्यात काही एक कारण नसतांना प्रौढाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळ्यात महाराणा प्रताप चौकात भरतसिंग नरसिंग पाटील वय ४० हे राहतात. ते मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील शिवाजी चौकात असतांना काही एक कारण नसतांना त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका मुलाने रस्त्यावर पडलेला दगड भरतसिंग यांच्या गालावर मारुन दुखातप केली. अशा आशयाच्या भरतसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल…

Read More

यावल-प्रतिनिधी ।शेतजमिनीचा वाद असलेला दाखल दाव्याच्या निकालाची नक्कम देण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळे शिवारात तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे शेतजमीन आहे. शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याचा दावा यावल तहसील कार्यालयात दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष लोकसेवक कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी (वय-५६) रा. लोकश नगर यावल याने ५०० रूपयांची लाच…

Read More

जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील । जळके शिवारात शेतातील शेततळ्यातील चक्क ११०० चौरस मीटर एवढा ६५ हजार रुपये किंमतीचा प्लास्टिक पेपर चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील रहिवासी प्रशांत अशोक पाटील वय ४० यांची जळके शिवारात शेती आहे. या शेतीत त्यांनी शेततळे उभारले असून त्यात ५० मायक्रॉन जाडीचा , ११०० रुपये चौरस मीटर लांबीचा पेपर शेततळ्यात टाकलेला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रशांत पाटील हे शेतात आले असता, त्यांना शेततळ्यातील प्लास्टिकचा पेपर दिसून आला नाही. सर्वत्र परिसरात शोध घेवूनही प्लास्टिकचा पेपर मिळून आला…

Read More

जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्ह्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवार १५ जून रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून गावातून मिरवणूक काढून औक्षण करत अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती होती. बुधवार १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज पूर्ण क्षमतेने पहिल्याप्रमाणेच सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदाने भरावले होते. या अनुषंगाने कानळदा गावातील शाळेच्या अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सवा साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात रांगोळी टाकून तसेच विद्यार्थ्यांना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात नव्यान ६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या १६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ६ कोराना रूग्ण आढळून आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाची नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज भुसावळ तालुक्यातून -३, चोपडा तालुका-१, यावल -२, असे एकुण ६ कोराना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या निलगायने भरधाव रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली होवून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. साबीर सत्तार बागवान (वय-४०) रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळकडून जळगावकडे येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगाय रस्ता क्रॉस करत असतांना रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली झाली यात रिक्षात बसलेला शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला मार…

Read More