लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ; सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार तब्ब्ल ११ दिवसांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे मंत्रिमंडळाचे ३ जुलै पासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होणार असून, याच पार्श्वभूमीवर आमदारांना मुंबईत बोलवण्यात येत आहे. आमदारांच्या सुरक्षतेसाठी गोव्यातील ताज कॉन्व्हेंशन हॉटेलबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे. गोवा विमानतळावर आमदारांसाठी स्पेशल स्पाईस जेटच्या चार्टर विमानतून सर्व आमदार मुंबईला येणार आहेत. सर्व आमदार गोवा पोलीस, गोव्याची कमांडो युनिट यांच्या घेराव्यात आमदारांच्या एकूण तीन बस आहे.आमदारांच्या स्वागतासाठी मुंबईत जय्य्त तयारी सुरू आहे. मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ९ च्या मार्गावर ढोल ताशे मागविण्यात आले आहेत. भाजप…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज गौरव पाटील :भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.जळगावात शिवसेनेतील बंडखोरीने शिवसैनिक नाराज आहेत. पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चे काढले. राज्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड पुकारला होते. सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी व शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना परतण्याचे आवाहन केले होते.काही कारणांनी परतले नाही. भाजपने नवीन खेळी खेळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. यामुळे बंडखोरांबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाली आहे. तसेच आपण सर्व शिवसेना आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील महापालिकेतही सत्तासंघर्ष होऊन शिंदे गटाने भाजपमधून 27 नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी हात पुढे दिला. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. पाठिंबा देणार्या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिलीच फाटाफूट आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरीदेखील उपस्थित होते. आणखी नगरसेवक संपर्कात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले की, आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील हरिओम नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर यशवंत सोमवंशी (वय ६१, रा.हरिओम नगर) यांच्या मुलाचा लग्न सोहळा शिंदखेडा जि.धुळे ३० जून रोजी होता. त्यामुळे सोमवंशी हे आपल्या परिवारासह घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर होते. दि. ३० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा घराचे दरवाजाचे कुलुप व कडीकोंडा तोडुन अज्ञात चोरट्याने ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे हे करीत आहेत.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी: शहरातील एसएमआयडी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार १ जूलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. गुरूवार २८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हेमंत चौधरी हा तरूण घरी असतांना त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता…
जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गंगापूरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय-३५) हा आपल्या पत्नी विद्या यांच्यासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केल्याचे २५ जून रोजी निष्पन्न झाले. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा…
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळले. परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.तिघा मायलेकांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय. शिरपूर येथील महिला इला व मुले महेश व रितेश गेल्या चार वर्षांपासून रांजणगाव येथील निवासस्थानी आहेत.इला मनोज पावरा (वय २५) व त्यांची दोन्ही मुले महेश मनोज पावरा (वय ११ महिने) व रितेश मनोज पावरा (वय ५) असे मृतांची नावे आहेत. मंगळवारी (दि.२८) रात्री महेश पावरा या बालकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. परंतु दुसरा मुलगा रितेश हेदेखील बेपत्ता होते. त्यांचा . ज्या विहीरीत महेश याचा मृतदेह आढळला त्या विहिरीला पाणी जास्त होते. वेळीच स्थानिक नागरीकांच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिंदे गटाने बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. अखेर भाजप आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. पत्रकार परिषदेत बोलताना ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गावाला रामराम केलं. आणि ठाण्यात दाखल झाले आहे. ते तिथेच स्थायिक झाले.ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून ११ वीचे शिक्षण पूर्ण केले. अशातच…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पहिल्यांदा फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार स्थापन होणार असून एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज फडणवीस यांनी केली आहे. आज पदाची शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली. तसेच नव्या सरकारमध्ये आपण नसणार मात्र सरकारचा चालवण्याची जबाबदारी आपली असल्याचेही म्हटले आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची माहिती मिळाली असताना देखील दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आठ ते…

