Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान झाले. आता मंत्रीपदासाठीच्या हालचाली निर्माण झाल्या असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महसूल मंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. राजकीय घडमोडी घडल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांना यापुर्वी सहकार राज्यमंत्री पद भुषविले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता असतांना अडीच वर्षे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील तीघ्रे गावातून गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यावर मध्यरात्री छापा टाकून सुमारे १ कोटी ६ लाख २० हजार रूपये किंमतीचा ८८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका तरूणाला अटक केली असून मंगळवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावात एक तरूण अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीसांच्या मदतीने तिघ्रे गावात सोमवारी ४ जुलै रोजी मध्यरात्री छापा टाकला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजप व शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असून दोन दिवसात खाते वाटपावर चर्चाही केली जाणार आहे. काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव महापालिकेत सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात सात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त स्तरावर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरीकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण १५ दिवसांच्या आत निवारण करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने सोमवारी ४ जुलै रोजी जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनाचे आयोजन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी एकुण ७ तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २ अर्ज, अतिक्रमण विभागासाठी १…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मान्सून काळातील सर्व यंत्रणांनी आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. सर्व विभागांनी आपल्या विभागाचे स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडीट, ईलक्ट्रिक ऑडीट करुन घ्यावे, नदी काठच्या गावांना वेळोवेळी सूचना कशा पोहचतील याची काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सोमवारी ४ जुलै रेाजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दिल्या. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची तयारी याबाबत आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, मंत्रालय, मुंबईचे प्रशांत वाघमारे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची कार्य प्रणाली, आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच शासनाकडून राज्यात सर्व जिल्हयांनी कार्यान्वित करण्यात येत असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समन्वय स्थापन करण्यासाठी Incident Response System विकसित करण्यात आलेल्या प्रणालीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनाही सादरीकरणाच्या…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चिंचोली येथील तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुषण संतोष पाटील (वय-२४) रा. चिंचोली ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली येथील भुषण पाटील हा आईवडीलांसोबत राहत होता. अहमदाबाद येथे तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून भुषण हा चिंचोली येथे आलेला होता. सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी त्याचे आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी भुषण हा घरी एकटाच होता. घरात कुणीही नसतांना त्यांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या शिवाजीनगर हुडकोतील तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरटयाचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या सुचना व आदेश दिले होते. शिवाजीनगर हुडकोतील संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या हा मोबाईल चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना…

Read More

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून तरूणाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद केली आला आहे. जळगाव जुना आसोदा रोडवरील समर्थ कॉलनीत राहणारे भाऊलाल कृष्णदेव चौधरी (वय-३८) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भाऊलाल हे भाजीपाला घेण्यासाठी दुचाकी ने कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी कृषी उत्पन्न बाजार परिसराच्या आवारात उभी केली होती. पुन्हा बाजार करून आले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार केली…

Read More

आज पर्यंत असा जाचा प्रवास तुम्ही पाहिलात का? जिथे एक व्यक्ती आणि कुत्राने चक्क 38 देश मोजण्यासाठी पायी प्रवास केला. हा व्यक्ति अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणारे टॉम तुर्किक आहे. सात वर्षांच्या प्रवासात टॉमसोबत असलेल्या डॉग सव्हानाने एक जागतिक विक्रम केला. टॉमसोबत असलेल्या डॉग सव्हानाने सुमारे 48 हजार किमीच्या प्रवासात एकत्र केला. अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्याने आपला प्रवास थांबवला नाही. टॉम तुर्किकने सांगितल्या प्रमाणे, पाच वर्षांत हा प्रवास पूर्ण झाला असता परंतु कोरोना महामारी आणि स्वत:च्या आजारपणामुळे त्याला आणखी दोन वर्षे लागली. या चालण्यामागे टॉमची एक कथाही आहे, ज्यामुळे त्याला ही भटकंतीची…

Read More

शिवसेनेतील चार कोंबड्यांना बाजूला करा, मग बघ शिवसेना कशी वाढते ! – आ. गुलाबराव पाटील मुंबई प्रतिनिधी । शिंदे गटातील शिवेसेनेचे बंडखोन नेते गुलाबराव पाटील यांनी अदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या प्रतित्युत्तर विधानसभेत दिले. यावेळी शायरीतून तर कधी आक्रमक होवून शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपाच्या विरोधात अडीच वर्षे सत्तेत असतांना याची जाणीव आम्हाला आहे. आदित्य ठाकरे किती फिरले पाहा. त्यांचे दौरे काढा. सर्व लिस्टवर आहे. पण एकटे शिंदे साहेब फिरले. शिंदे पाच वेळा आमच्या मतदारसंघात आले. शरद पवार 80 वर्षाचा माणूस जळगावात तीन वेळा आले. टोपे आले, मुंडे आले, अजितदादा आले. जयंत पाटील आले. तुम्ही का नाही…

Read More