Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरी करणार्‍या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला महिलेसह एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जळगावातील बसस्थानकात घडली. याप्रकरणी दोन जणांवर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ. राहुल सांडू अग्रवाल (वय-२८) हे मंगळवारी १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बसस्थानकातून त्यांच्या पाकीट चोरल्याची घटना घडली. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तात्काळ बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी इसम व महिला गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार…

Read More

सोलापूर-प्रतिनिधी । भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिली. संबंधित महिलेने गुंगीचं औषध दिल्याचा आरोप देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केलाय. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. संबंधित महिलेनं ग्रीन टीमध्ये गुंगीचं औषध टाकून माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यानंतर चारित्र्य हननाचा प्रयत्न केला. या प्रकारात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तसंच संबंधित महिलेविरोधात ओशिवरा अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रपिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे असं देखील देशमुख यांनी सांगितले आहे. यानंतर महिलेचा १७ मिनीटाचा कॉल रेकॉर्डींग व्हायरल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना रजेवर कारागृहाबाहेर पडून फरार झालेल्या बंदी आरोपीला एलसीबीच्या पथकाने बुधवारी अमळनेर शहरातून अटक केली आहे. वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे रा. भोईवाडा, अमळनेर अस अटकेतील या आरोपींच नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्हयात वसंत अहिरे यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना ५ जून रोजी आरोपी अहिरे यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी वसंत कारागृहात पुन्हा दाखल झाले नाही. त्यामुळे याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंदी आरोपी वसंत हा अमळनेरात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । व्हॉट्सॲप चॉटींग करून तरूणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलेल्या तारखेडा येथील तरूणीचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्रास देणारा तरूण व त्याची आई यांना अटक करावी अशी मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. दिव्या दिलीप जाधव (वय-२१) रा. तारखेडा ता. पाचोरा जि.जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, दिव्या जाधव ही आई वडीलांसह वास्तव्याला होती. आईवडील हाती मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख निर्माण झाली होती. निलेशने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिव्याची दिशाभूल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून लग्न करणार…

Read More

तापी नदी पत्रात न जाण्याचा जिल्हा प्रशासनाचे आवाहन भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने बुधवारी सायंकाळी हतनूर धरणाचे सर्व ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून ३० हजार ४४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी १३ जुलै रेाजी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात बुधवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण…

Read More

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने संपूर्णतः रस्ते पाण्याखाली गेले. येथील नागरिकांसमोर दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.शाळकरी विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाना सदरच्या पुराच्या पाण्यामुळे आपआपल्या घरी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नाशिकध्ये सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी झाली. यावेळी धावपळीत अनेकदा नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमध्ये पुढील…

Read More

वावडदा, वाकडी परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्याचा नागरीकांची मागणी प्रविण पाटील प्रतिनिधी । वावडदा-म्हसावद रोडवरील प्लॉस्ट कंपनीतून १२ हजार रुपये किंमतीचे भंगार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वावडदा, वाकडी या परिसरातील गुन्ह्याचा शोध देखील लावावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वावडदा-म्हसावद रोडवरील श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनी आहे. या कंपनी आवारात भंगार सामान तोडताड करुन ठेवलेला होता. सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा १२ हजार रुपये किंमतीचा सामान चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय…

Read More

सोलापूर वृत्तसंस्था । सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्षांचे एका महिलेसोबत आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. व्हिडीओत महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. महिला व्हिडीओमध्ये रडत रडत सांगत आहे की, देशमुख यांनी आपल्याशी संबंध ठेवून आता आपल्याला धोका दिला. या व्हिडीओत देशमुखही दिसत असून त्यांच्याकडे बोट करून ही महिला हे सांगत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देशमुख यांच्याकडे विचारणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, देशमुख यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. एका घरात किंवा हॉटेलातील हा व्हिडीओ असून एका खोलीत दोघेच आहेत. तिने…

Read More

यावल प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने प्रवाशी ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना आहे. या अपघातात किनगाव येथील सतरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस प्रकाश तायडे (वय-१७) रा. किनगाव ता. यावल हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपूर येथ गेले होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो मंगळवारी १२ जुलै रोजी सकाळी जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी ॲपेरिक्षाने बसला. धामणगाव फाट्याजवळ पेट्रोलपंपासमोरून प्रवाशी रिक्षा जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार आला. तर…

Read More

मुंबई वृत्तसेवा । भाजपा हा आपला नैसर्गिक मित्र पक्ष आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. अशी माहिती शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांच्या विनंती वरून शेवटी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर खा. गोडसे यांची प्रतिक्रीया घेतली त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊतांनी शिंदेंना टॅग केल्यामुळे खळबळ माजली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाला मदतीचा हात करावी, अशी आम्ही मागणी होती. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, असं आम्ही सांगितलं. यावर विचार करू…

Read More