Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनी सात तक्रारी अर्ज दाखल
    जळगाव

    महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनी सात तक्रारी अर्ज दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव महापालिकेत सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात सात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांनी दिली.

    शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त स्तरावर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरीकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण १५ दिवसांच्या आत निवारण करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने सोमवारी ४ जुलै रोजी जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनाचे आयोजन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी एकुण ७ तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २ अर्ज, अतिक्रमण विभागासाठी १ अर्ज, नगर रचना विभागासाठी ३ अर्ज आणि आरोग्य विभागासाठी १ तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, महसुल उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर !

    October 23, 2026

    पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !

    October 23, 2026

    शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.