Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

विजय पाटील: जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे आहे. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. मुस्तकीमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. यावेळी मुस्तकीम इलेक्ट्रिक वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्याच्यासोबत…

Read More

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष सत्कार मुंबई | प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी (४ जुलै) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित दिलीपराव निकम यांना प्रतिष्ठेचा ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करून राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रभावी युवा नेतृत्व आणि सहकार चळवळीच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत निकम यांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री रवींद्र चव्हाण, बबनराव (बाबासाहेब) पाटील, उदय सामंत, आशीष शेलार, मंगल प्रभात…

Read More

आयुक्त ॲक्शन मोडवर; तक्रारीची दखल घेत तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मेहरूण सर्वे नं. ४९०/१ ते ४०६, ४०७ मार्गे जाणारा मोहाडी रोड ते शिरसोली मुख्य शिवरस्ता अखेर नव्याने करण्यात येणार आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, तसेच विद्यार्थी, शालेय बस, पालक, मजूर, नोकरदार, व्यापारी आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.या मागणीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना ऑन-द-स्पॉट पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे…

Read More

चोपडा | प्रतिनिधीजळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित कार अडवून तपासणी केली असता आरोपींकडून गावठी कट्टा व मॅगझिनसह इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी…

Read More

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मोहोडी रस्ता ते गुरु पेट्रोल पंप मार्गे पाचोरा रोडवरील मलंग शाह बाबा दर्गा परिसरातील सुमारे ३०० मीटर लांबीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचे नमूद केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग परिसरातील नागरिक, व्यापारी, शाळकरी…

Read More

पाळधी (ता. जळगाव) : येथील स. ना. झवर विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पोषण आहारात अपहार व निष्काळजीपणाचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यालयात अचानक तपासणी केली. यावेळी ऑनलाईन नोंदींमध्ये पोषण आहाराचा साठा शून्य दाखविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शाळेच्या परिसरात पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे धान्य तसेच अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. ऑनलाईन नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने संशय अधिकच बळावला आहे.तपासणीदरम्यान पोषण आहारासाठी वापरल्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज :धरणगाव प्रतिनिधीवाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी राबविला आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जीपीएस मित्र परिवाराला त्यांनी एकूण ₹1 लाख 71 हजारांची आर्थिक मदत प्रदान केली.यामध्ये यश सुनील मंत्री यांनी ₹71 हजार, तर अमोल कासट यांनी ₹1 लाख रुपयांचे योगदान देत सामाजिक कार्याला बळकटी दिली. ही मदत जीपीएस मित्र परिवाराचे सर्वेसर्वा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.वाढदिवस म्हणजे केवळ केक, डीजे, फ्लेक्स-बॅनर्स आणि पार्ट्यांचा उत्सव नसून तो समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असू शकते, हे…

Read More

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज  : जळगाव विधान परिषद ची निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांचे  बेरजेचे राजकारण वजाबाकी झाले असल्याचा इतिहास ताजा आहे. आता होऊ घातलेल्या या निवडणुकीनंतर भाजपाची दिशा कुठल्या नेत्यांची फिरेल हे सांगणे अवघड आहे परंतु राजकीय इतिहास पाहता व नंदू महाजन यांची उमेदवारी म्हणजे भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे.अगदी वीस वर्षांपासून चा राजकीय विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीनंतर नेतृत्व अडचणीत येतं किंवा बदलविले जाते असा राजकीय इतिहास आहे. माजी खासदार ए टी पाटील व माजी आमदार  गुरुमक जगवानी  यांची 2004 ची निवडणूक झाल्यानंतर तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मनीष…

Read More

चिंतामणी मोरया परिसरात तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण धरणगाव | प्रतिनिधीधरणगाव शहरातील चिंतामणी मोरया परिसरात चोरट्यांच्या टोळीची दहशत निर्माण झाली असून तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास चार संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. यावेळी एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार येताच तिने तत्काळ आरडा-ओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरातील एका बंद घरासह एका छोट्या दुकानाला लक्ष्य केले. बंद घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू हाती…

Read More

धरणगाव : ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने धरणगाव येथे अनुलोम संस्था आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मोतीबिंदूसह विविध डोळ्यांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असून, ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’ अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तपासणीदरम्यान काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात रेफर करण्यात आले.या शिबिरात…

Read More