Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
    कृषी

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्ह्यातील 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर

    विजय पाटील जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्राप्त झाली असून जळगाव जिल्ह्यातील एकूण 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे.

    या  पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव, संस्थेचे कार्यालय तसेच बँक स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन अग्रीस्टॅक नोंदणी करावी.

    कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्र तसेच बँकेच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी यासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    यात्रेतील आकाश पाळणा ठरला जीवघेणा; केसांसह डोक्याची त्वचा उपटली !

    September 12, 2026

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.