अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा अतिवृष्टी दौरावर आहेत. राज्यावर नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे खासदार व आमदारांना एकत्र करून काम केल्यास त्याचे रिझल्ट लवकर मिळतात.मात्र दुर्दैवाने आज असे होताना दिसत नाही, अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे. राज्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी आज मुंबईत एकनाथ शिंदे सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली असून, त्यात मोठे निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना याचा फायदा करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थीतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती, त्यातून काही नावे वगळण्यात आले होती. आम्ही मात्र कोणालाही यातून वगळू नका, असा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये अनुदानपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.त्यामुळे राज्यातील जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सहा हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले जाणार आहे. असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन…
जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात करगावात एका 11 वर्षीय चिमुकलीवर महिनाभरात अनेकवेळा सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ नराधमांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.पीडितेचे आई-वडील मजूर असून करगावकर हे अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतात. 19 जून रोजी करगावकर हा मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला आपल्या सोबत घरी येण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी कारगावकरसोबत त्याच्या घरी गेली, जिथे त्याने आणि त्याचा मित्र मुरस्कर यांनी मुलीवर बलात्कार केला.”आरोपीने मुलीला काही पैसे दिले आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका असे…
जळगाव प्रतिनिधी भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारतासाठी आज कौतुकास्पद दिवस आहे. सध्या जागतिक कॅडेट्स कुस्ती चॅम्पियनशिप 2022 ही एकत्रित स्पर्धांची जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धा सुरु आहे. दिनांक 25 ते 31 जुलै या कालावधीत रोम, इटली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फारिम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. 2022 वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये ग्रीको-रोमन (GR) 55kg स्पर्धेत सूरजने सुवर्णपदक जिंकले आहे. या प्रकारात यापूर्वी कुस्तीपटू पप्पू यादव…
जळगाव प्रतिनिधी नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्नाला यश आले नाही. त्यामुळे आता ज्या ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक जाहीर झाली आहे. तर आता ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनवावणी पार पडली. यावळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारले आहेत. नगरपरिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. तसंच, ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचे वेळापत्रक आधीच जारी केले होते. त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात. मे महिन्याच्या आदेशानुसार 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित केल्या जाणार होत्या. तसेच 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पंचायत समितीच्या अंतर्गत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यात आठ गटासाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण पुढील प्रमाणे बांभोरी प्र.चा.-एससी महिलापाळधी खुर्द – एसटी महिलाबांभोरी बु – एसटी जनरलचांदसर बु – जनरल (ओबीसी पुरूष)पिंप्री खर्द – जनरलनांदेड – जनरल महिलासाळवा -जनरल महिला
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या पदांची नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ही शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रंही आज देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेली पण आता पक्षही हातचा जातो का अशी परिस्थिती सध्या झाली आहे. खरी शिवसेना कुणाची? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशापरिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिलाय. शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २७ जुलै रेाजी दुपारी धुळे शहरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत.योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर, पारोळा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरात एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता छापेमारी केली. यात गावठी हातभट्टीचा अड्डा उध्दवस्त करून सुमारे तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या वेगवेगळ्या पाच पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीची गावठी दारू बनविण्याचे साहित्य…
एकनाथ शिंदे गटातील राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन नवीन निर्णय जाहीर करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. गणपती उत्सव काळात राज्यभरात मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील केसेस रद्द करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केलीय.तसेच पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावेळी ते…

