Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात असलेल्या गीता इंडस्ट्रीज कंपनीतून इलेक्ट्रिक सर्व्हिस वायरचे बंडल आणि अल्युमिनियम कॉईल असा एकूण ५९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सेक्टर मधील ३२ मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याचे काम होते. दरम्यान १९ जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून ५९ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेला. हा…

Read More

Live Maharashtra news: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. प्रशिक्षणार्थी पायलट हे विमान चालवत असताना शेतात कोसळल्याने हा अपघात झाला. इंदापूर येथील कडबनवाडी गावात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटच्या विमानाचा अपघात झाला आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास अपघातात घडला भाविका राठोड असे जखमी विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले होते. बारामती येथून सकाळी विमानाने कार्व्हर एव्हिएशन उड्डाण केले आणि काही वेळाने अपघात झाला. इंधन संपल्याने विमान क्रॅश झाले. आत्तापर्यंत याबाबत पुष्टी झालेली नाही. अपघातानंतर महिला पायलट स्वतः कॉकपिटमधून बाहेर पडली. महिला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे.कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कृषिप्रधान म्हणून ओळखले जाणारे देशामध्ये कांद्याला सतत मातीमोल भाव मिळत असतो. शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आजमितीस शेतकर्‍यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातील महिलेला अनोळखी व्यक्तीने मोबाईल अश्लिल व्हिडीओ तसेच फोटो पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार, २३ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी महिलेला एका अनोळखी व्यक्तीने १५ जुलै रोजी अश्लील फोटो , अश्लिल व्हिडीओ तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत महिलेचा फोटो शेअर करुन महिलेची बदनामी व्हावी असे कृत्य केलं. याप्रकरणी महिलेचे शनिवार, २३ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व संस्कार केला या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज…

Read More

चोपडा ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल चोपडा-प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० जूलै रोजी रात्री ९ वाजता मुलगी घरी असतांना राहूल अशोक सोनवणे रा. धुळे याने तिला काहीतरी सांगून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर मुलगी मध्यरात्री दीड वाजता घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. पिडीत मुलीच्या आईने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गावाकडे तलाठ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असतात तर चक्क गुरुवारी रात्री रावेर शहरातील स्टेशन जळगावात दारु पिऊन अंडी विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा करताना एक व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. परंतु या प्रकरणाचा कोणतीही गुन्हा दाखल झाला नाही. जळगाव तालुक्यातील एका गावातील तलाठ्याने अंडा पाव विक्री करणार्‍या विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा घालताना. चक्क विक्रेत्याशी डोके लावले व अंडी विक्रेत्याला कारवाईची धमकी देखील दिली. मात्र विक्रेत्याने देखील पोलिसाची धमकी दिली. तळीराम तलाठ्याच्या इतर सहकार्‍याने वाद मिटवला. दोघांनी धूम ठोकली असली तरी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. धिंगाणा घालणार्‍या तलाठ्याकडे महसूल प्रशासनाचा छुपा असलेला…

Read More

पिंप्री ता. धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे. हे काम केलेल्या निविदाप्रमाणे करण्यात आलेली नसून घोळ करण्यात आल्याची तक्रार नितीन धनगर याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. निवीदा काढून बांधकामाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान निविदाप्रमाणे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याबाबत शहरातील नितीन राजेंद्र धनगर या तरूणाने जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार देवून एक महिना होवूनही कुठल्याही तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही नितीन धनगर या तरूणाने लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील जळकी मील भागात खून झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा हरीविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने काही मिनिटात एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून दर आठवड्याला कुठे ना कुठे खून झाल्याची घटना कानावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा…

Read More

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळ जवळ एक हफ्ता विश्रातीनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह मराठवाडा आणि घाट परिसरातदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं काहजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जून महिन्यात राज्यातील इतर भागांप्रमाणेच पुणे जिल्हातसुद्धा पावसानं पाठ फिरवली होती, मात्र जुलै महिना सुरु होताच पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. काही दिवसांच्या दमदार बॅटींगनंतर पावसानं एक आठवडाभर विश्रांती घेतली होती,…

Read More