चाळीसगाव ‘- चाळीसगाव शहरात गेल्या वर्षापासून रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नागरिकांनी याबाबत नगरपालिकेला वारंवार लिखित स्वरूपाची तक्रारी केल्या. मात्र प्रतिसाद शुन्य मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तहसील कार्यालयापासून नगरपालिका दरम्यान ढोल बजाव आंदोलन सोमवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी चाळीसगाव खड्डे मुक्त झालेच पाहिजे अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान येत्या पंधरा दिवसांत खड्डे बुजवण्यात आले नाही तर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना इतर कामांसाठी पैसे आहेत. परंतु चाळीसगावातील विविध भागातील रस्त्यांसाठी पैसे नाहीत अशी खोचक टीकाही करण्यात आली. चाळीसगाव शहरात गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पाचोरा ;-तालुक्यातील डोंगरगाव स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रच्या स्थापनेला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. डोंगरगाव येथे 22 ऑगस्ट 2010(रविवार) या दिवशी केंद्राची स्थापना करण्यात आली.केंद्रात बेटी बचाव बेटी पढाव,वृक्षारोपण, विविध सण-उत्सव साजरे करून संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येतात . आज पालखी सोहळ्यात सहभागी स्वामी सेवा केंद्राचे सहकारी बंधू -भगिनी गणेश भजनी मंडळ,दीपक पाटील, दीपक वाळके,भानुदास सावळे,समाधान सावळे ,नाना वाळके ,समाधान इजारे,योगेश कळवत्रे, राहुल गुजर,रामेश्वर बडक,दिनेश आवारे,ज्ञानेश्वर वखरे,जितेंद्र सावळे, मुकेश मापारी,महादू सावळे दगडू वखरे विजू बाबा सावळे यांच्यासह…
जळगाव – आगामी होणार्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस स्वतंत्र पॅनल निर्माण करुन जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी ,प्रदेश सचिव डी.जी.पाटील, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जिल्हा बँक संचालक डॉ.सुरेश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, माजी जि.प.सदस्य आर.जी. पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, एस.टी. पाटील, विकास वाघ, जमील शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष शामकांत तायडे आदी उपस्थित होते.
जळगाव;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ४बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून १, भडगाव-१ आणि चाळीसगाव तालुक्यातून २ असे एकुण ४ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६८२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २६ बाधित रूग्ण हे जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगाव ;- पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळीराजाप्रती बांधिलकी म्हणून सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. हा अनोखा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे…
जळगाव;- शहरातील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्यावर सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून नियोजित अत्याधुनिक सुलभ शौचालय निर्माण केले जाणार आहे. हे शौचालय क्रीडा संकुलाजवळ पोलीस मल्टीपर्पज हॉलबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ.अश्विनी विनोद देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना पाठविले आहे. राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्याधुनिक शौच्यालयाच्या बांधकामाला प्रथम दर्शनी कोणाचा विरोध नाही. परंतु ज्या ठिकाणी सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून अत्याधुनिक शौचालयचे बांधकाम नियोजित आहे. त्या जागेवर बांधकाम होवू नये ही जनभावना आहे. अत्याधुनिक शौचालयाचे बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकासमोरील जागेजवळ नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले “चिमुकले राम मंदिर…
जळगाव ;- जिल्ह्यात क्रोरोना आजाराचा संसर्ग कमी झालेला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी २८ रुग्णांवर उपचार सुरु असून आज ३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत . जळगाव शहरात ३ बाधित रूग्ण तर उर्वरित सर्व तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २८ बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजवर जिल्ह्यात एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगाव;- शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत येत्या आगामी निवडणूका जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी समारोप प्रसंगी सांगितले. या बैठकीत मा. डॉ. राजेंद्र फडके व माजी आ. स्मिताताई वाघ यांनी संघटनात्मक विषयात मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संघटनात्मक आढावा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी केले व जिल्हा परिषदेच्या सूचना जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे यांनी केल्या. आभार जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. या बैठकीला आ. मंगेश चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष…
जळगाव ;- भारतात असलेल्या तरूण मनुष्यबळाचा वापर कशा पध्दतीने करता येतो याचा परिपाठ विद्यापीठाने कोविडच्या या काळात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत तयार करून घालून दिला असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि.१७ ते दि.२१ ऑगस्ट या कालावधीत विद्यापीठाच्या अधिसभागृहात करण्यात आले. त्याचा आज समारोप झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, यांची उपस्थिती होती. डॉ.…
जळगाव;- डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची वैष्णवी किशोर लोखंडे हिने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर महाविद्यालयात आज तिला श्रध्दांजली सभेतून शोक भावना व्यक्त करण्यात आल्यात व परिसरात तिची आठवण राहावी म्हणून वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता एन एस आर्विकर,स्त्रीरोग तज्ञ माया आर्विकर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ विठठल शिंदे, डॉ. बापूराव थिटे, डॉ विजय मोरे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी वैष्णवी ही सर्व मित्र मैत्रीणीची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. तिच्या आठवणीसाठी एक वृक्ष लावून संगोपन करण्यात येणार असल्याचे डॉ. बापुराव थिटे यांनी मनोगतातून सांगितले .…

