Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळालंय. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो. पंतप्रधान मोदी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मित अड्डा आज उध्वस्त करण्यात आला आहे. नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनचे २०० लिटर मापाचे १२ टाक्या रसायने भरलेल्या मिळून आल्याने रसायन पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक शंकर शेळके, फौजदार करीम सय्यद, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशिव, प्रवीण पाटील, वैभव बाविस्कर यांनी केली.

Read More

नागपूर ;- अंघोळीसाठी कान्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. यवतमाळ मधील दिग्रसमध्ये राहणाऱ्या 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी गेले असता सकाळाच्या सुमारास हे सर्व तरुण अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने यातील 5 युवक बुडाले आहे. नदीत उतरण्याचा मोह न आवरल्याने तसेच तरुणांना नदीचा प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुडालेल्या पाच तरुणांचे वय 18 ते 22 वर्ष वयोगाटातील आहेत.मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही…

Read More

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी बी निकुंभ हायस्कुल घोडगाव शाळेच्या पर्यवेक्षक पदी शाळेतील जेष्ठ शिक्षक वसंत नागपुरे यांची संस्थेच्या संचालक मंडळाने निवड केली आहे. यापूर्वीचे पर्यवेक्षक एस बी अहिरराव हे सेवानिवृत्त झाल्यामुळे नागपुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, सचिव जवरीलाल जैन, संचालक मंडळ, गोविंदभाई गुजराथी,मुख्याध्यापक आर पी चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More

जळगाव I प्रतिनिधी चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला शनिवार पासून प्रारंभ झाला. सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर पाटील अध्यक्षस्थानी होते, प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, संस्थेचे सहसचिव संजय रतनसिंह, संस्थेचे संचालक सुधीर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: केंद्र सरकार व सीबीआय च्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे कोणतीही चूक नसताना त्यांच्यामागे व त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे हा त्यातीलच एक भाग आह. विरोधकांवर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा वापर करीत आहे. एकनाथराव खडसे याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. असे प्रतिपादन चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता  पत्रकारांशी बोलताना  सांगितले . चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव  तालुक्यात  ३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे  ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून…

Read More

जळगाव I प्रतिनिधी अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले असून याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे,चित्रीकरण पाल व मध्य प्रदेश मधल्या काही ठिकाणी उत्कृष्टरित्या संपन्न झाला. ‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन आले आहे दिनांक 1 सप्टेंबर रोजी अरविंद इंटरटेनमेंट च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ हे फुल साँग रिलीज झाला . बंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे सोबतच नेहा…

Read More

चाळीसगाव शहरासह ठिकठिकाणच्या पाहणीत ग्रामस्थांशी साधला संवाद जळगाव I प्रतिनिधी चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास कारणीभूत आणि पर्यावरणाची हानी पोहोचविणारे नदी पात्रातील अतिक्रमित आणि विना परवानगी केलेले बांधकाम काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. चाळीसगाव शहरासह तालुक्यात 30 ऑगस्ट, 2021 रोजीच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेकडो जनावरे वाहून गेली तर काही जनावरांचा जागेवरच मृत्यू झाल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…

Read More

जळगाव प्रतिनिधी : यापूर्वी गणेशोत्सव आला की कायदा सुव्यवस्था यासाठी बैठका बोलविण्यात येत असत मात्र गेल्या वर्षांपासून कोव्हिडं मुळे निर्बंधआली मात्र जलगावकारांनी यात चागले सहकार्य केले आणि संकटातही सर्वांनी आनंदाने गणेश उत्सव साजरा केला एक ठिकाणी परवानगी देण्याची सोय करण्यात येणार असून मिरवणुकीत ढोल ताशे वाजता येणार नाही मात्र जागेवर ढोल ताशे वाजता येईल त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: दारूचा व्यवसाय नियमित सुरू ठेवावा यासाठी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक याला ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.  सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे दारू विक्रीचा व्यवसाय आहे. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान दारू व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात जावून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी ५०० रूपये…

Read More