Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव ;- जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील २९ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बँकेच्या वतीने क्रांतीकारी देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी ठोठावलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आधारित सेल्युलर जेल च्या देखाव्याचे भव्य सादरीकरण देखील करण्यात आले होते. या वर्षीची कोविड विषाणूजन्य परिस्थिति लक्षात घेता साध्या पद्धतीने देखावा सादर करण्यात येणार असून बँकेचे सभासद व ग्राहक यांचेसाठी विविध विषयांवर आधारित ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात…

Read More

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Read More

जळगाव ;- नागर विमानतळ सुरक्षा ब्युरो (Bureau of Cvil Aviation Security), नागर विमानतळ, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार विमान अपहरण उपहास सराव आज जळगाव विमानतळावर यशस्वीरित्या पार पडला हा सराव आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: विमान अपहरण होण्याच्या सि्थतीमध्ये सुरक्षा संबंधित एजन्सी यात महाराष्ट्र पोलीस टीम, बॉम्ब शोध व डिस्पोजल पथक, एअरलाईन्स, IB, SID, MSF, अग्निशमन सेवा, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारत दूरसंचार विभाग, वनविभाग यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि प्रतिसाद याची तपासणी करण्यासाठी केला जातो. जळगाव विमानतळाच्या वायू यातायात नियंत्रण कक्षामध्ये भोपाळवरुन औरंगाबाद जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाल्याचा पायलटचा संदेश मिळाला, अपहरणकत्यांनी विमानाला…

Read More

जळगाव ;- 8 सप्टेंबर जागतिक फिजीयोथेरेपी दिनाचे औचीत्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात फिजीयोथेरेपी दिवस साजरा करण्यात आला. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शारिरीक बाधा व व्यंग असलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिजियोथेरेपी सेवा सुरु करण्यात आली असून, सदर सेवेच्या माध्यमातून दिव्यांग बालकांच्या विकासासाठी फिजीयोथेरेपी सेवा अंत्यत प्रभावी असून त्यामाध्यमातून त्यांचे व्याधीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होत आहे. दिव्यांग मुलांच्या विकासासाठी फिजियोथेरेपी व फिजीयोथेरेपीस्ट यांची भुमीका अत्यंत मोलाची…

Read More

जळगाव I प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॉक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटर भवन येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षिका किरण गांधी यांनी मूर्ती कशी बनवावी, शाडू मातीचे फायदे, प्रदुषणाचा धोका याविषयी मार्गदर्शन केले. सहभागी 86 विद्यार्थ्यांना रोटरी वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, प्रेसिडेंट इलेक्ट सुनील सुखवाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी रोटरॉक्ट जळगाव वेस्टचे अध्यक्ष नेहा कोठारी, सचिव जागृती भागवानी, प्रोजेक्ट चेअरमन वैभव अबोटी, सचिन पटेल, अमृत्त मित्तल, धीरज फटांगळे, प्रतिक वाणी, वेदांत खाचणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

Read More

जळगाव ;- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 9 ‘शिक्षकांना नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड‘ प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यात सुचिता बाविस्कर (मनपा शा.क्र.38 जळगाव), सुनीता शिमाले (क्रिडा रसिक सोसा.संचालित प्राथ.शाळा), जयश्री पाटील (चांदसरकर प्राथ.शाळा), अनिल शितोळे (नुतन मराठा माध्य. विद्यालय), किरण चौधरी (भगीरथ माध्य.विद्यालय), नरेंद्र वारके (क.रा.वाणी बाल निकेतन), मनोहर तेजवाणी (आदर्श सिंधी माध्य. विद्यालय), सागर झांबरे (शारदा प्राथ.शाळा सुप्रीम कॉलनी), राजेंद्र साहेबराव पाटील (शिक्षण शास्त्र विद्यालय, नूतन…

Read More

जळगाव;- चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिरात सहभागी झालेल्या ४२ रासेयो स्वयंसेवकांनी चाळीसगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, श्रमदान करून पुरग्रस्तांच्या वेदना समजून घेत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या चार दिवसीय शिबीराचा समारोप मंगळवारी झाला. दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप संस्थेचे सचिव अरूण निकम…

Read More

अमळनेर ;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 223 व्या पुण्यतिथीनिमित्त बसस्थानकाजळीलअहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील,खा.शि.मंडळाचे जितेंद्र जैन,योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल, एल. टी.पाटील, बन्सीलाल भागवत,अशोक पवार,समाधान धनगर,हरचंद लांडगे,वसुंधरा लांडगे,नितीन निळे,अलीम मुजावर संदीप घोरपडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहिवद येथेही अभिवादन दहिवद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले या सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास आमदार अनिल पाटील यांनी माल्यार्पण केले कार्यक्रमास मा.सभापती सुभाष देसले,शिवाजी पारधी, सुनील आण्णा, अशोक…

Read More

कजगाव ता .भडगाव ;- येथे दिनांक ६ रोजी विजेच्या धक्क्याने वानराचे दुःखत निधन झाले होते वानराच्या दुःखत निधनाने संपूर्ण कजगावकरांनी तीन दिवसाचे सुतक पाळून एकतेचा संदेश दिला त्यामुळे संपूर्ण गावात तीन दिवसाचे सुतक पाळले गेले होते . तर आज दिन दिवसानंतर दशक्रिया विधी असल्याने कजगावातील तब्बल चारशे नागरीकांनी आपल्या डोक्याचे केस दान करून वानरराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तर ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून संपूर्ण गावाला दशक्रिया विधी निमित्ताने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी नरेश पाटील निलेश पाटील ,भूषण पाटील, लालसिंग पाटील ,ईश्वर पाटील, राहुल पाटील, जयपाल पाटील सुभाष पाटील रवींद्र पाटील देवीदास महाजन मनु सोनार ईश्वर बोरसे अमोल…

Read More

जळगाव ;- शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत रक्कम नाही तर ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत’ द्यावीभारतीय किसान संघाच्या वतीने आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव शाखेच्या भारतीय किसान संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले असून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर, उपाध्यक्ष शिवराम महाले, कपिला मुठे, डॉ. दिपक पाटील, वैभव महाजन, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, रतिलाल कोळी, सतिष पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार श्रीकांत नेवे, भगवान न्हायदे, अमोल पाटील, प्रेमचंद भारंबे, अनुप पाटील, प्रतिक पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद महाजन, श्रीकांत श्रीखंडे,…

Read More