Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन हजाराची लाच भोवली; धरणगाव येथील विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास अटक
    क्राईम

    दोन हजाराची लाच भोवली; धरणगाव येथील विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 30, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । तक्रारदारला जादा वेतन दिले गेल्याने जादा रकमेची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणाऱ्या धरणगाव ग्रामविस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

    याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायतीत तक्रारदार हे शिपाई म्हणून नोकरीला आहे. तक्रारदार यांना सन २०१५-१६ वर्षात जादा वेतन दिले गेल्याने सदर जादार देण्यात आलेली रक्कमची परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांना नोटीस आली. नोटीसीचा अनुकूल अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यासाठी धरणगाव येथील विस्ताराधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१) रा. गंगूबाई नगर, पारोळा आणि कंडारी बुद्रुक ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५) रा. बोरोले नगर, चोपडा यांनी २ हजाराची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार आज सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना दोन हजाराची रक्कम घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. दोघांवर चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.