चाळीसगाव शहरासह ठिकठिकाणच्या पाहणीत ग्रामस्थांशी साधला संवाद जळगाव I प्रतिनिधी चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास कारणीभूत आणि पर्यावरणाची हानी पोहोचविणारे नदी पात्रातील अतिक्रमित आणि विना परवानगी केलेले बांधकाम काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. चाळीसगाव शहरासह तालुक्यात 30 ऑगस्ट, 2021 रोजीच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेकडो जनावरे वाहून गेली तर काही जनावरांचा जागेवरच मृत्यू झाल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी : यापूर्वी गणेशोत्सव आला की कायदा सुव्यवस्था यासाठी बैठका बोलविण्यात येत असत मात्र गेल्या वर्षांपासून कोव्हिडं मुळे निर्बंधआली मात्र जलगावकारांनी यात चागले सहकार्य केले आणि संकटातही सर्वांनी आनंदाने गणेश उत्सव साजरा केला एक ठिकाणी परवानगी देण्याची सोय करण्यात येणार असून मिरवणुकीत ढोल ताशे वाजता येणार नाही मात्र जागेवर ढोल ताशे वाजता येईल त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे…
लाईव्ह महाराष्ट्र: दारूचा व्यवसाय नियमित सुरू ठेवावा यासाठी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक याला ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे दारू विक्रीचा व्यवसाय आहे. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान दारू व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात जावून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी ५०० रूपये…
जळगांव प्रतिनिधी: येथे “श्री कृष्ण जन्माष्ठ्मी” कोरोना निर्बंधाचे पालन करून उत्साहात झाली साजरी करण्यात आली. श्री कृष्णांना १०८ भोग व भजन कीर्तनात भक्त गण झाले मंत्रमुग्ध. तब्बल “सव्वा मण (५०किलोने) मिरची, मीठ व मोहरीने” श्री कृष्ण लालांची नजर कडकडीत नजर उतरविण्यात आली. “श्री राधे सरकारांच्या” श्री बालाजी दरबारात, महात्मा गांधी मार्केट जळगाव येथे श्री कृष्ण जन्माष्ठमीला ३० रोजी रात्री १२:०० वाजता १२१ नैवद्य निवेदन केल्यावर महाआरती करण्यात आली नंतर ०१:०० वाजता नंदोउत्सवाला सुरवात झाली त्यानंतर श्री कृष्ण लालांची झुल्यातच भजन कीर्तनाच्या तालात तब्बल “सव्वा मण (५०किलोने) मिरची, मीठ व मोहरीसह” “श्री कृष्ण लालांची नजर कडकडीत नजर उतरविण्यात आली”. तद्नंतर दहीहंडीचा…
जळगाव प्रतिनिधी: शहरातील निमखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनीमध्ये सार्वजनिक गटार बांधकामामध्ये मोठ्या गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून माजी सैनिकाच्या घरासमोरील गटारीचे काम न करता बिले काढल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. जळगाव मनपा हद्दीमधील मौजे निमेखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनी मधील गट नं.१०१, प्लॉट नं.३८ येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक योगराज रामदास पाटील यांच्या घरासमोरील हा प्रकार असल्याचे कळते. योगराज पाटील हे गेल्या अकरा वर्षापासून याठिकाणी राहतात. त्यांच्या घरासमोरील उत्तरेकडील गल्लीमध्ये सार्वजनिक गटारीचे बांधकाम सुरू होते मात्र काही कारणास्तव ते बंद पडले यानंतर चौकशी केली असता ते पुर्ण झाल्याचे रहिवाश्यांना समजले. दरम्यान योगराज पाटील यांच्यासह…
जामनेर प्रतिनिधी : शहरातील बेस्ट किराणा या दुकानातून चोरट्यांनी सात लाख रूपया किमतीचे गोडेतेलाचे डबे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की,जामनेर येथील पाचोरा रोडवर अभय चंपालाल बोहरा यांचे बेस्ट किराणा हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. येथून चोरट्यांनी गोडे तेलाच्या डब्यांची चोरी केली. या प्रकाराबाबत मुकेश बोहरा यांनी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळ गाठून श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, पाऊस व वाहनाचा वापर झाल्याने श्वान पथकाचाही उपयोग झाला नाही. याप्रकरणी अभय बोहरा यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत यांचा पूरग्रस्त बांधवांसाठीचा मदतीचा ओघ आजही सुरूच. लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांचे अतिवृष्टीमुळे खूप प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यातच तालुक्यातील बाणगावात देखील शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड नुकसान झालेले आहे.गावातील घरांमध्ये संपूर्ण पुराचे पाणी आल्यामुळे अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू सडक्या झालेल्या आहेत.त्यात अनेकांचे गुरे,घरे,संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर इतर शेतकऱ्यांचे देखील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा बाधित बांधवांना आज मदतीची व सहकार्याची गरज निर्माण झालेली आहे.अशा बाधितांसाठी श्री सत्यसाई आपत्ती व्यवस्थापन,मेडीकेअर प्रोजेक्ट व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळ यांचा मदतीचा ओघ आजही सुरूच असून आज बाणगावात फिरता दवाखाना ॲम्बुलन्सच्या…
लाईव्ह महाराष्ट्र | शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रा.पं.च्या भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. गावाच्या विकासाच्या व भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून गावाच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार दि.३० रोजी सदर शिरसाड ग्रा.पं.ची ग्रामसभा योजिली होती.दरम्यान सभा सुरू झाल्या पासून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रविण (गोटू) सोनवणे तसेच माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरून १४ व्या वित्तआयोगाचे २५ लाख रुपये खर्च करून खोटे बिले टाकल्यामुळे गावाचा पाहिजे त्या खर्चाच्या तुलनेत विकास झाला नाही या मुद्यावरून विरोध प्रदर्शित…
लाईव्ह महाराष्ट्र दि. १ | जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुराच्या तडाख्याने अनेक शेतकऱ्यांची पशु संपत्ती मृत्युमुखी पडली आहे. तसेच शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांची शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाली असून या पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई रक्कम मिळण्यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुरामुळे नुकसान ग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच जीवित नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना दर एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या गाईला ७० हजार, म्हशींसाठी एक…
जळगांव प्रतिनिधी: शहरातील पांडे चौकात रंगकाम करतांना ४० वर्षीय तरूणाला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीआहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) रा. तांबापूरा हे पेंटरचे काम करतात. घरामध्ये आईवडील तीन भाऊ, पत्नीसह राहतात. पेंटर काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना त्यांचा हाताला इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा…

