धरणगाव प्रतिनिधी: येथील तरडे येथे राहणारे विक्रम कौतिक पाटील याचे वृद्धपकाळाने निधन झालेविक्रम कौतिक पाटील याचे वृद्धापकाळाने दुःखद निधन 12 रोजी सायंकाळी ५ वाजता झाले. त्यांची अंत्ययात्रा आज 13 रोजी ( सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्षव तरडे गावाचे पोलीस पाटील कैलास पाटील याच्या वडील होते .
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र : वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तब्बल सहा लाख रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ ते साकेगावच्या दरम्यान बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले होते. यामुळे पथरोड व सहकार्यांनी साकेगाव येथील मयूर मदन काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथरोड व सहकार्यांनी त्याला पिस्तूल, चॉपर व शस्त्रांचा धाक दाखवून ५ लाख रूपये खंडणीची मागणी केली. मागणी मान्य झाल्यावर त्यास सोडले.यानंतर मयूर काळे याने सागर भोई याला ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन लाख रूपये दिली. तर, या टोळक्याने मयूरला…
जळगाव प्रतिनिधी :दवाखान्यात जाण्याच्या क्षुल्लक कारणा वरून वादा झाला स्वतः च्या बापला त्याच्याच दोन्ही मुलांनी खूनकेल्याची धक्कादायक घटना शहरातील निमखेडी शिवारातील काताई नेत्रालय येथे आज १२ रोजी सकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे.प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाजवळ प्रेमसिंग राठोड हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात वाद झाला. या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून आपल्या मुलांना धमकावले.…
लाईव्ह महाराष्ट्र : रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले आहे पोलीस निरीक्षक याना चोरट्यांनी घरफोडी करून आव्हान दिले असून बंद घरातून 50 हजाराची रोकड लंपास केली.याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहीती अशी की , रावेर येथील शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी न्यना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद असल्याने दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरून नेला याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस…
लाईव्ह महाराष्ट्र : भुसावळ शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी कुटुंबासोबत गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला वाचवण्यात यश आले आहे. झेडटीसी परिसरात मनीष यादव हे वास्तव्याला आहेत. दीड दिवसानंतर ते आज सकाळी गणेश विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळच्या तापी नदी पात्रात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागला होता . त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. यात आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका…
कृषी मंत्री भुसेंची संवेदनशीलतालाईव्ह महाराष्ट्र: ढगफुटीमुळे जामनेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते याच वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले. त्याला पाहणी कृषिमंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्याच्या घरी झाले त्याला आश्वासन दिले की बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले. ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिल्यात.मंत्री दादा भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर…
लाईव्ह महाराष्ट्र: रेल्वे अडर पासमध्ये पाणी भरल्याने चाळीसगाव तालुक्यातील 7 ते 8 गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेतीचे नुकसान झाले त्यासाठी तात्काळ मदत मिळावी अश्या आशयाचे निवेदन कृषी मंत्र्याची गाडी अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दिले. रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मंत्री मोहदयाना विनंती करण्यात आली व त्यांना रोहिणी रेल्वे गेट…
जळगाव प्रतिनिधी : हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये 6 मुलींची निवड हॉकी यांनी शनिवारी घोषित केली. जळगाव जिल्ह्यातील ज्युनिअर बॉईज मध्येमोहम्मद तौसीफ शकील कुरैशी, फ़राज़ फ़िरोज़ तड़वी ( सर्व भुसावळ), चेतन विलास माळी, धीरज धनराज जाधव, गणेश कांतिलाल चौधरी, हरिप्रकाश शिवपाल सैनी, दिवेश चौधरी, अबरार सय्यद जावेद, (सर्व जळगाव), मोइन खान (राखीव खेळाडू, भुसावळ). तर सिनियर मुली वर्षा भगवान सोनवणे, कोमल मनोज सोनवणे, सरला रविन्द्र असवार, गायत्री अर्जुन असवार, वैष्णवी संतोष चौधरी, चेतना…
जळगाव प्रतिनिधी : नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून बंद घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजरूल इस्लाम खलील अहमद रा. परकोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ते ९ सप्टेंबर रात्री ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून लॉकर तोडून त्यातील सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र: जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्याच्या नगरविकास खात्याने जारी केलेल्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्तपदी असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ते लवकरच आपला कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आकाश डोईफोडे यांच्या नियुक्तीने वेग येण्याची शक्यता आहे.

