• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यापीठात चार दिवसीय रासेयो शिबीराचा समारोप

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 8, 2021
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
विद्यापीठात चार दिवसीय रासेयो शिबीराचा समारोप

जळगाव;- चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय “आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिरात सहभागी झालेल्या ४२ रासेयो स्वयंसेवकांनी चाळीसगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, श्रमदान करून पुरग्रस्तांच्या वेदना समजून घेत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या चार दिवसीय शिबीराचा समारोप मंगळवारी झाला.

दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप संस्थेचे सचिव अरूण निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रतिभा चव्हाण, योजनाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. पकंजकुमार नन्नवरे, डॉ. प्रशांत कसबे, उपप्राचार्य डॉ.एस.बी. महाजन, डॉ. जी.डी. देशमुख, डॉ. आर.पी. निकम, डॉ.ए.एल. सुर्यवंशी, डॉ.सौ.यु.पी. नन्नवरे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. जाधव यांनी रासेयो स्वयंसेवकांनी वाकडी, बायपास रोड ते पाटणा, पिंपरखेड तांडा, वाघडू या गांवामध्ये केलेल्या कामांचे कौतुक केले. आपल्या भाषणात दिलीप पाटील यांनी पुरग्रस्तांना रासेयोनेच्या विद्यार्थ्यांनी जो धीर दिला तो कौतुकास्पद असून निसर्गावर कोणीही मात करू शकत नाही. मात्र त्यांना मदतीचा हात दिला जाऊ शकतो असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अरूण निकम यांनी श्रमदान आणि सेवाभाव यातूनच समाजाचा व देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केले. चार दिवसाच्या या शिबिरात स्वयंसेवकांनी या गांवामध्ये स्मशानभूमीची स्वच्छता, रस्ते दुरूस्ती, नाले सफाई, गाळ आणि कचरा काढणे आदि श्रमदान करून पुरग्रस्त आदिवासी बांधवांच्या व शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांचे दु:ख समजून घेत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. आ. मंगेश चव्हाण यांनी शिबिर ते श्रमदान स्थळ अशी वाहन व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. तहसिलदार अमोल मोरे यांनीही सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले, डॉ. आर.पी. निकम यांनी सूत्रसंचालन केले, डॉ.ए.एल. सुर्यवंशी यांनी आभार मानले.

या शिबिरासाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.बी. पाटील, उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, सहसचिव संजय पाटील तसेच प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव, प्रा. मंगला सुर्यवंशी, प्रा. एच.आर. निकम, प्रा. के.पी. रामेश्वरकर, ए.बी. सुर्यवंशी, एम.एस. कांबळे, मंगेश देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, राजू गायकवाड, कैलास चोधरी आदिंनी सहकार्य केले.

 

Previous Post

अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

Next Post

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डचेे वितरण

Next Post
रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डचेे वितरण

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डचेे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group