Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

पाचोऱ्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने ना. एकनाथ शिंदेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या  राजकारणाची माहिती आ. किशोर पाटील यांचे कडून जाणून घेतली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा  नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीती बाबत त्यांनी गुप्तगू केली. शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले. या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनासह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील धरणी परिसरात ‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’ चे उदघाटन आज दि. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाप्रेमींची चहाची आवड लक्षात घेऊन अस्सल गुळाचा चहा झक्कास टी हाऊस च्या माध्यमातून तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत या हेतूने लक्ष्मी दुग्धालय चे उदघाटन धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. आज ‘कोजागिरी पौर्णिमा व ईद – ए – मिलाद’ च्या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून दुधात साखर आणि चहा चे मिश्रण एकजीव व्हावे अगदी तशाच प्रकारे या दोन्ही फ्रेंचायजींचा उदघाटन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट हे तीन वर्षापासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. याला रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली असून लवकरच भुयारी मार्गाचे कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंकज महाजन यांनी आज मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी पत्राद्वारे कळविले आहे. भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट नंबर १५३ गेल्या तीन वर्षापासून भुयारी मार्गाचे कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या फार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटांना संकटांचा सामना करावा लागत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर सर्व पक्ष किंवा महा विकास आघाडी झाल्यास तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून पहिले चेअरमन म्हणून गुलाबराव देवकर हे आमचे ठरले असल्याचे बिनविरोध निवड झालेले जिल्हा बँकेचे सदस्य संजय पवार यांनी महाराष्ट्र लाइव्ह शी बोलताना सांगितले. महाराष्ट्र लाईव्ह संवाद संस्थांना जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित सदस्य संजय पवार म्हणाले की गेल्या तीन पंचवार्षिक पासून धरणगाव तालुका प्राथमिक शेती सोसायटीतून मी प्रतिनिधित्व करीत आहे पंधरा वर्षापासून सर्वपक्षीय मतदान म्हणजे राष्ट्रवादी भाजप शिवसेना काँग्रेस यांच्या मतदार यामुळे विरोध होत असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांना श्रेय दिले तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे मतदार जे शेतकरी आहेत त्यांनाही त्यांनी या…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शासनाकडून २७ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात पाणी पुरवठा नियमित होत नसल्याची ओरड होती. यासंदर्भात अद्यापपर्यंत निधी मंजूर नसल्यामुळे कामकाज होत नव्हते. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला धरणगाव शहरात नवीन व वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला. दरम्यान, शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून सुमारे २७ कोटी ४४ लाख ६ हजार २७५ रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर या कामाला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच बँकेवर पिता पुत्रांनी भगवा फडकविला आहे त्यामुळे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील व त्याचे सुपुत्र अमोल पाटील अनुक्रमे एरोडल,पारोळा विकासोतून बिनविरोध विजयी झाले आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन सदस्य जेडीसीसी बँकेवर विजयी झाले।आहे त्यामुळे जेडीसीसी बँकेवर  भगवा फडकला आहे. दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना, जळगाव यांच्या मार्फत देण्यात येणारा सन २०२०-२१चा कृषी भूषण पुरस्कार पि.के.पाटील यांना खा उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आज जळगाव येथील सौ.संदीपा ज्ञानेश्वर वाघ यांच्या राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना, जळगाव तर्फे आयोजित तसेच खान्देश कुणबी मराठा वधू-वर गृप,गौरी समुह,वावडदा यांच्या सौजन्याने किड्स गुरूकुल स्कूल, जळगाव येथे  खासदार उन्मेश  पाटील यांच्या शुभहस्ते  गजानन ठिबक सिंचन संचालक तथा आपल्या शेतात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग विक्रमी उत्पादन घेतात व त्यांची ही कृषी क्षेत्रातील यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरेल कृषीप्रधान देशांतील कृषी संस्कृतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपलं प्रगतशील…

Read More

जळगाव महाराष्ट्र लाईव्ह । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज तीन उमेदवार बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात धरणगाव तालुक्यातून संजय पवार हे जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग तिसऱ्यांना निवडून आले आहे. निवड झाल्याने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करून अभिनंदन केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात धरणगाव आतून संजय मुरलीधर पवार हे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी जिल्हा बँक निवडणूक लढवत असून त्यात राष्ट्रवादीचे संजय पवार हे बिनविरोध निवडून आले आहे. निवडीबद्दल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी धरणगाव तालुक्यातून प्राथमिक शेती मतदारसंघातून भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार हे तिसऱ्यांदा  बिनविरोध निवडून आले आहे.अजून अधिकृत घोषणा करणे बाकी आहे धरणगांव तालुक्यातुन जिल्हा बँक निवडणुक प्राथमिक शेती मतदार संघातुन सर्व पक्षिय उमेदवार संजय मुरलीधर पवार आज १८ रोजी अखेर दिवशी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, या मतदार संघातून कोणीच अर्ज न भरल्याने बिनविरोध विजयी झाले आहे. यापूर्वी दोन वेळा बिनविरोध विजयी झाले होते यावेळेस तिसऱ्यादा बिनविरोध विजयी झाले आहे.

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत सूर्यवंशी उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे जाणार आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने अभिमानास्पद असल्याने मित्र परिवाराच्या वतीने संकेत चा सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत Germany येथील Bavaria राज्यातील Hochschule für Angewandte Wissenschaften Hof या कॉलेजमध्ये ‘Masters In operational Excellence’ या शिक्षणक्रमाचे अध्ययन करण्यासाठी उद्या दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जर्मनी ला रवाना होणार आहे. संकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. BE Mechanical ला (8.6 CGPA First class with distinction)…

Read More