Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ना. एकनाथ शिंदेच्या गुप्त भेटीची विविधांगी चर्चा !
    पाचोरा

    ना. एकनाथ शिंदेच्या गुप्त भेटीची विविधांगी चर्चा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोऱ्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने ना. एकनाथ शिंदेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या  राजकारणाची माहिती आ. किशोर पाटील यांचे कडून जाणून घेतली.

    जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा  नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीती बाबत त्यांनी गुप्तगू केली. शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले. या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनासह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे या भेटीची पाचोरा शहरासह जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा रंगली होती.

    दरम्यान पाचोरा शहरातील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीस ना. एकनाथ शिंदे यांचेसह केवळ आ. किशोर पाटील, मुकूंद बिल्दीकर, व नगराध्यक्ष संजय गोहिल हे चारच जण उपस्थित होते. याबैठकीत अनेक खलबते झाल्याची माहिती आहे. पालिकेअंतर्गत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेत तात्काळ सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे नियोजन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी ना. एकनाथ शिंदे यांचेवर सोपवली असल्याने त्यांनी अशा प्रकारे गुप्त दौऱ्यांची सुरुवात पाचोऱ्यातून केल्याची माहिती समोर आली आहे.

    बंदद्वार चर्चेत राजकीय खलबते

    तिघांच्या बंदद्वार चर्चेत राजकीय खलबते
    दरम्यान या भेटीवेळी श्रीराम मंदिर परिसरात ना. एकनाथ शिंदे, आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दीकर या तिघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी यात विविध राजकीय विषयांवर खलबते झाल्याची माहिती असून पालिका निवडणुकांची रणनीती आखली गेल्याची माहिती समोर आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.