Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- लातूर येथील  रिमार्ट शॉपी नावाच्या कंपनीच्या मालकाने यावल येथील 25 वर्षीय युवतीला 999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रूपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शुभांगी जुगल पाटील (वय-२५)  रा. गवत बाजार मेनरोड यावल ह्या गृहिणी महिला आहे. दरम्यान त्यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५) रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर यांनी “999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरा मध्ये प्रवेश करताना किंवा शहराबाहेर जाताना असलेला कालिंका माता ते तरसोद फाट्यापर्यंत च्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता पंधरा दिवसात दुरुस्त न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला. भुसावळ वरून तरसोद फाट्यापर्यंत फोरवे झाला आहे मात्र तरसोद फाटा ते कालिंका मंदिर हा शहरात येणारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे किंवा शहरातून बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्ता असलेला कालिका माता मंदिर ते तरसोद फाटा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून त्यावर खड़े जास्त झालेले आहेत. त्यामुळे रोजच्या अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोप पत्यारोप होत असताना छाननी पूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे एक असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर यानंतर छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती.  धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून  संजय मुरलीधर पवार  तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार असली…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: शहरातील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील धरणगाव – जळगाव रस्त्यावर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे व त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विचार करता महाविद्यालयाच्या काही अंतरावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. शहरात एकच महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, अश्या परिस्थितीत रस्त्यावरून जाणारे वाहने सुसाट वेगाने जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसात गतिरोधक बनवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेकडून करण्यात आली. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री आर्यन सैंदाणे,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणूकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बोदवड विकास सोसायटी मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचादेखील संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी बातमी म्हणजे माजी आमदार स्मिताताई वाघ यांचा अंमळनेर विकास सोसायटी मतदार संघात उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड झालेले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अर्ज छाननीत भाजपला मोठा धक्का बसला असून खासदार रक्षाताई खडसे व अमळनेर विकास सोसायटी मतदार संघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांचाभाजपा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला असून राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते बिनविरोध होणार आहेत याची घोषणा लवकरच होईल.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील गायरानसाठी गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी आरक्षित आहे.या जागेवर मुबईच्या एक संस्थेने अतिक्रमण केले आहे. याआरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत काढण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी करणेबाबत गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. येथील गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी असलेले गायरान आरक्षित जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेले अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांनी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी धरणगाव तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेश दिलेले असुन अद्याप सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने धरणगाव येथील गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी मंचचे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला देण्यात आला. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहननाना पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंदआबा देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, विद्यार्थी उपाध्यक्ष वासुदेव…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शासन सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. हे उपक्रम गावपातळीपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी महसुल विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अशी सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री. गमे पुढे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील निमखेडी शिवारात सदनिका खरेदी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६) रा. रिधुर वाडा शनीपेठ यांनी ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस…

Read More