Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मध्यप्रदेशातून औरंगाबाद येथे चालल्या ट्रक मध्ये  50 गुरांना कोंबून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पाल पोलीसांनी पकडला आहे. यात दोन जणांना ताब्यात घेतले असून गुरांची सुटका करण्यात आली आहे. पोलिस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात येणाऱ्या गुरांना निर्दयी पणे कोंबुन अवैध वाहतूक करणारा ट्रक  शेरी नाकामार्गे एमपी १७ एचएच १८०३ हा ट्रक सुमारे ५० गुरांची अवैध पध्दतीने कत्तलीसाठी जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पाल पोलिस चौकीचे पॉहेकॉ राजेंद्र राठोर, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, पोकॉ दिपक ठाकुर, पोलीस नाईक अतुल तडवी, पो. कॉ. संदीप धनगर यांनी सापळा रचून ट्रक आडविला आहे. यात ४५ गुरांची सुटका करणयत आली आहे तर…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील नगर परिषदेचे गटनेते विनय भावे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शिवसेना शहरात तर्फे जाहीर कीर्तन सोमवारी ठेवण्यात आले आहे या कीर्तन जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. धरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विनय शशिकांत भावे (पप्पू भावे) याच्या वाढ दिवसानिमित्ताने ह भ प पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर याचे 25 रोजी  सॊमवरी सायंकाळी 7 वाजेला  जाहीर कीर्तन ठेवले आहे साने पटांगण, काटे बाजार धरणगाव  येथे आयोजित केले आहे  या कार्यक्रमाचे आयोजन हे धरणगाव शहर  शिवसेना  यांनी आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धरणगाव शहर शिवसेनेतर्फे करण्यात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन येथे एक तरुण गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसात अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन परिसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश अंबादास बारी (वय-३१) रा. बारीवाडा पिंप्राळा याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मारवाड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याची चार्टशीट पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना पोलीस नाईक लाज लूजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यातपोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी 15 हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी DYSP. शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे  सापळा लावला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर अडीच लाख रूपया सह तिजोरी उचलून दरोडा टाकला होता. टोळीचे २ म्होरके ठाणे , वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीला न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर  अडीच लाख रूपया सह  तिजोरी उचलून दरोडा टाकला होता  याबद्दल जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो.काँ.समाधान पाटील, विकास पहुरकर, पो.ना. सलीम तडवी यांच्या पथकाने पहिल्या आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी  वय २८, रा.…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चा शेवटचा पांडवसभा वाहनांचा पुजा व आरतीसाठी लहान माळी वाडा येथील माळी समाज, पाटील समाज, तिळवण तेली समाज तसेच क्षत्रिय मराठे समाज या चारही समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळ यांना बोलावून पुजा व आरती करण्याचा मान देण्यात आला. खरं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा अनुषंगाने प्रशासनाने रथ व वाहन मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने वाहनांची जागेवर पुजा व आरती रात्री सात वाजता व शेवटची आरती रात्री दहा वाजता करण्यात येते. वाहन व्यवस्थापक मंडळाने पहिल्या दिवसाच्या वाहना पासून तर शेवटचा पांडवसभा चे वाहना पर्यंत गावातील प्रतेक समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळांना बोलावून आरती…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी येथे आत्मा अंतर्गत खान्देशी शेतकरी गट स्थापन करण्यात आला. सदरील गटातील शेतकऱ्यांना लाल भेंडी पिकाविषयी आत्मा बिटीएम दीपक नागपुरे यांनी मार्गदर्शन केले. लालभेंडी पिक व्यवस्थापन व विक्री बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील गटातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाविन्यपूर्ण भाजीपाला लागवड व भाजीपाला हातविक्री करून जास्त नफा मिळवावा, असे आव्हान करण्यात आले. ॲडव्हान्टा कंपनीच्या ‘कुमकुम लाल भेंडी’ प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट प्रसंगी बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, कृषी सहाय्यक किरण वायसे, योगेश काकडे, रामकृष्ण पाटील उपस्थित होते.शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर हरभरा व ज्वारी बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे वाटप पिंप्री येथे कैलास ऍग्रो व जाज ऍग्रो,…

Read More

जळगाव, दि.२३ – शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते पत्रकार चेतन वाणी यांचे वडील होते.

Read More

लक्ष्मण पाटील: पुणे येथील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज जमीनदोस्त होत आहे, ज्या शाळेने महिला सक्षमीकरणासाठी भक्कम भिंत उभी केली, लहुजी वस्ताद यांची मुक्ता तिथं पोत्यात घालुन शिक्षणाकरिता आणली , आणि याच वाड्यातून गुलामीच्या मुक्तीची विट सशक्त भारत उभारण्यासाठी देश मजबुतीसाठी रचायला सुरुवात केली, ज्याने स्री पुरुष दोघांना सुशिक्षीत केले आणि यावरच आज देश मजबुत उभा राहिला पण ज्या वाड्याने देश मजबुत केला त्याचीच एक एक वीट मात्र आज कोसळत आहे. सन २००८ पासून हा लढा मा. न्यायालयात आहे, त्यावर किती वेळा शासनाने आपले मत मांडले आणि शाळा वाचवण्यासाठी…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जयहिंद व्यायाम शाळा व नवयुवक दुर्गा माता मित्र मंडळ यांच्या वतीने पांडव सभेचे वाहन उत्सव निमित्त लहान माळी वाडा परिसर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेत जवळ पास 121 स्पर्धक सहभागी झाले होते. काल रात्री एका छोटेखानी कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याप्रसंगी श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, मंडळाचे सदस्य चंदु अण्णा, कडू महाजन, पांडुरंग मराठे, रघुनाथ चौधरी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, धनपा चे उपनगराध्यक्ष विलास महाजन, बालाजी पंतसंस्थेचे व्यवस्थापक राजेद्र महाजन, पर्यवेक्षक महाजन सर आदी उपस्थित होते. प्रारंभी आयोजकांचा वतीने…

Read More