प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शासनाकडून २७ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात पाणी पुरवठा नियमित होत नसल्याची ओरड होती. यासंदर्भात अद्यापपर्यंत निधी मंजूर नसल्यामुळे कामकाज होत नव्हते. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला धरणगाव शहरात नवीन व वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला. दरम्यान, शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून सुमारे २७ कोटी ४४ लाख ६ हजार २७५ रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर या कामाला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच बँकेवर पिता पुत्रांनी भगवा फडकविला आहे त्यामुळे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील व त्याचे सुपुत्र अमोल पाटील अनुक्रमे एरोडल,पारोळा विकासोतून बिनविरोध विजयी झाले आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन सदस्य जेडीसीसी बँकेवर विजयी झाले।आहे त्यामुळे जेडीसीसी बँकेवर भगवा फडकला आहे. दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि…
प्रतिनिधी प्रविण पाटील: राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना, जळगाव यांच्या मार्फत देण्यात येणारा सन २०२०-२१चा कृषी भूषण पुरस्कार पि.के.पाटील यांना खा उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आज जळगाव येथील सौ.संदीपा ज्ञानेश्वर वाघ यांच्या राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना, जळगाव तर्फे आयोजित तसेच खान्देश कुणबी मराठा वधू-वर गृप,गौरी समुह,वावडदा यांच्या सौजन्याने किड्स गुरूकुल स्कूल, जळगाव येथे खासदार उन्मेश पाटील यांच्या शुभहस्ते गजानन ठिबक सिंचन संचालक तथा आपल्या शेतात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग विक्रमी उत्पादन घेतात व त्यांची ही कृषी क्षेत्रातील यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरेल कृषीप्रधान देशांतील कृषी संस्कृतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपलं प्रगतशील…
जळगाव महाराष्ट्र लाईव्ह । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज तीन उमेदवार बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात धरणगाव तालुक्यातून संजय पवार हे जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग तिसऱ्यांना निवडून आले आहे. निवड झाल्याने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करून अभिनंदन केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात धरणगाव आतून संजय मुरलीधर पवार हे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी जिल्हा बँक निवडणूक लढवत असून त्यात राष्ट्रवादीचे संजय पवार हे बिनविरोध निवडून आले आहे. निवडीबद्दल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी धरणगाव तालुक्यातून प्राथमिक शेती मतदारसंघातून भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार हे तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहे.अजून अधिकृत घोषणा करणे बाकी आहे धरणगांव तालुक्यातुन जिल्हा बँक निवडणुक प्राथमिक शेती मतदार संघातुन सर्व पक्षिय उमेदवार संजय मुरलीधर पवार आज १८ रोजी अखेर दिवशी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, या मतदार संघातून कोणीच अर्ज न भरल्याने बिनविरोध विजयी झाले आहे. यापूर्वी दोन वेळा बिनविरोध विजयी झाले होते यावेळेस तिसऱ्यादा बिनविरोध विजयी झाले आहे.
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत सूर्यवंशी उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे जाणार आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने अभिमानास्पद असल्याने मित्र परिवाराच्या वतीने संकेत चा सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत Germany येथील Bavaria राज्यातील Hochschule für Angewandte Wissenschaften Hof या कॉलेजमध्ये ‘Masters In operational Excellence’ या शिक्षणक्रमाचे अध्ययन करण्यासाठी उद्या दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जर्मनी ला रवाना होणार आहे. संकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. BE Mechanical ला (8.6 CGPA First class with distinction)…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील चांमगाव येथे आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने शेतात बांधलेल्या गाईवर हल्ला केला आहे त्या गाई मृत्यू झाला. धरणगाव तालुक्यातील चामगाव येथील शेतकरी चद्रंभान सुधाकर कोळी यांच्या शेतात बिंमट्याने गाईवर हंल्ला करुन ठार केले. दोन दिवस आधीच एका गाईचे अशाचप्रकारे बिबट्याने हल्ला केला होता व आज देखील केला आहे गेल्या दोन महिन्यात ही पाचवी ते सहावी घटना आहे या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. नागरिकांकडून या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बंद करावा अशी मागणी केली आहे.घटनास्थळी तलाठी आरिफ शेख व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मराठा विद्याप्रसारक मंडळातील वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमिवर तानाजी भोईटे यांच्यासह त्यांच्या गटातील नऊ जणांवर ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ कायद्याच्या अंतर्गत कलम वाढविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक फिर्याद ऍड. विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. यात संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी दबाव टाकून ऍड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग…
ग्रंथ हेच गुरू – पी. डी. पाटील सर प्रतिनिधी लक्ष्मण पाटील:- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जैताने या गावातील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे यांच्याशी विस्तृत चर्चा झाली, हजारो पुस्तक पाहण्याचा योग आला. वाचनालय भेटीदरम्यान अनेक विद्यार्थी त्या वाचनालयात अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली. सदर विद्यार्थी पोलीस भरती, स्पर्धा परीक्षांचा अविरतपणे अभ्यास करीत आहेत. वाचनालयाचा त्यांना अतिशय चांगला फायदा होत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीची आशा धूसर झाली आहे मात्र भाजपा 21 जागांवर अर्ज भरणार असे आमदार गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी तीनदा बैठका होऊन देखील काहीच निष्कर्ष निघाला नसतांनाच कॉंग्रेसने महाविकास आघाडीची मागणी केली आहे. यामुळे आज भाजपच्या मॅरेथॉन बैठकीनंतर स्वबळाची तयारी करण्याचे ठरविण्यात आले. आ. गिरीश महाजन यांनी याबाबत घोषणा करतांना उद्या सर्व उमेदवार अर्ज भरणार असल्याचे सांगितले. गेल्या वेळेस प्रमाणे यावर्षीही जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय आघाडी पॅनलचे निर्मिती व्हावी असे प्रयत्न पालक मंत्री गुलाबराव पाटील हे करीत होते गाणे कोर कमिटी या तीन वेळेस बैठका…

