Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: गेलेला व्यक्ती हा परत येऊ शकत नसला तरी आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावीच लागणार आहे. यासाठी राज्य शासन आणि भाऊ म्हणून आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील ५२ विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी २० हजार तर आत्महत्याग्रस्त दोन शेतकर्‍यांच्या पत्नींना प्रत्येकी लाखाची मदत करण्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या  १८ ते ५९  वर्षे वयोगटातील कमावत्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी  २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मासुमवाडी परिसरातील सय्यद असरार नगर येथे मध्यरात्री घरातून दोन मोबाईलसह रोकड असा एकुण ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित वसीम कबीर पटले याला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, शेख सलीम शेख रशिद (वय ४७) हे ब्रोकर आहेत. सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेख सलीम व त्यांचे कुटुंब झोपले. मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाची आतून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील २ मोबाईल, २५ हजार रुपये रोख, २३ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या १२ अंगठ्या, ८ ग्रॅमचे चांदीचे पेंडल व ३ तीन लहान पितळी भांडे असा ५५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंगळवारी सकाळी ६…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आरोग्य सेवकांच्या परीक्षेला मुला बरोबर आलेल्या औरंगाबाद येथील प्रौढाला एकाने एटीएम कार्ड बदली करून परस्पर ३३ हजार रूपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमदडे येथील  बन्सी बाबुलाल सनगत (वय-४३) ( ह.मु. गंगापूर, औरंगाबाद) हे ३१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हे त्यांचा मुलाची आरोग्य सेवकाचा परिक्षा देण्यासाठी जळगावात आले होते.  शहरातील कोर्ट चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये जावून त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतू काढता आले नाही. त्यावेळी ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरूण मुलगा तेथे आला. मी पैसे काढून देतो असे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शिवाजी नगर भागातील हुडको परिसरात महापालिकेचे कर्मचारी वालमन पाणी सोडण्यासाठी जात असतांना दोन जणांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, उमाकांत संभाजीराव चव्हाण (वय-५८) रा. पिंप्राळा शिवार जळगाव हे जळगाव महापालिकेत वालमन म्हणून कर्मचारी आहे. ते शहरातील विविध भागात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उमाकांत चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने शिवाजी नगर हुडको भागात पाणी सोडण्यासाठी जात असतांना जनार्दन कोळी आणि गणेश (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. शिवाजी नगर यांनी चव्हाण यांचा रस्ता आडविला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ग्रामीण भागातील एक युवक वृत्तवाहिनी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करून भरारी घेऊ शकतो हे आज लाइव्ह महाराष्ट्र संपादक मी आपल्या कामातून संपूर्ण जळगाव जिल्ह्याला दाखवून दिलेले आहे त्यांनी सुरू केलेल्या या चॅनलला शुभेच्छा देत सदर चे चैनल संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू व्हावेत अशा शुभेच्छा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.लाईव्ह महाराष्ट्र चॅनल च्या वतीने आज दिवाळी अंकाचे प्रकाशन छोटेखानी कार्यक्रमात अजिंठा विश्रामगृह येथे पार पाडले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील युवक गेल्या वर्षभरापासून मोठ्यात धडाडीने एक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका व दश्मीगव्हाण ग्रामपंचायत यांच्या वतीने दि . ३० शनिवार रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर तालुक्यातील तसेच शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राजकीय- सामाजिक शासकीय, शैक्षणिक, क्रीडा ,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमावेळी बोलताना तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की कोरोणा काळामध्ये प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची तारेवरची कसरत पाहावयास मिळत होती .ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयातील बेडची जाणवणारी कमतरता या सर्व गोष्टींमुळे नियोजन करत असताना अधिकाऱ्यांची होणारी धावपळ यातून प्रत्येकाची परीक्षा होत होती, मात्र आज पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुरस्काराने सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भाजपातर्फे सोमवारी  शिवतीर्थ मैदान ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता.  जमाबवंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री उशीरा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आ. गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण ७ ते ८ हजार लोकांचा जमाव जमला होता. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी माजी मंत्री…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे  विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील  खेडगाव शिवारातील 23  सप्टेंबर रोजी शेतगट नंबर २२५/२ मधील दत्तात्रय नारायण कोठावदे यांच्या शेतातील विहीरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरुन मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल झाला होता.अनोळखी मयताची ओळख पटविण्याकरीता मेहुणबारे पोलीसांनी मयताचे फोटो सर्वत्र प्रसारीत करुन वर्तमानपत्रे,सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. त्याला यश आले असून चाळीसगाव तालूुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील सोमनाथ प्रभाकर पाटील असल्याची माहिती मिळाली. बोरखेडा बु. येथील  सोमनाथ प्रभाकर…

Read More

भाईदास पाटील: दिव्यांग सेना आणि दिव्यांग विकास महासंघ यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब श्री नितीन कुमार देवरे यांचा सत्कार दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष श्री पी एम पाटील सर, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री अक्षय महाजन सर, तालुका अध्यक्ष संजय पाटील,यांच्या माध्यमातून करण्यात आला.यावेळेस तहसिलदार यांनी मार्गदर्शन करून सर्व गोरगरीब तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजना मध्ये 35 किलो धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना बीपीएल पिवळे कार्ड देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यावेळेस वासुदेव वाघ धरणगाव शहराध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, महिला उपजिल्हाध्यक्ष सरला सोनवणे, देवा महाजन, सुदाम चव्हाण, सपना चौधरी,शहर प्रमुख नंदलाल कुलथे, राजू चौधरी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून करून  शेतातील  झाडाला स्वतः पँट च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीचा खून का केला यामागील कारण अजून उलगडले नाही.पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु”  येथे  राहणारे  सतिष धनसिंग परदेशी (वय – ३८), गायत्री सतिष  परदेशी (वय – ३२), ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह  राहतात 28 च्या रात्री संपूर्ण कुटुंब   झोपेत असताना  शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान सतिष धनसिंग परदेशी याने गाढ झोपेत असलेली पत्नी गायत्री सतिष परदेशी हिचा दोन्ही हाताने गळा आवळून…

Read More