Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी या वर्गातील ऋषिकेश गोरख महाजन व इयत्ता सातवी या वर्गातील कृष्णा गोरख महाजन ह्या दोघ भावांनी अतिशय अथक मेहनतीने “आत्मा मालिक एज्युकेशन स्पोर्ट कोकमठाण या स्पोर्ट अकॅडमी कॉम्पिटिशन मध्ये कुस्ती या खेळ प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमशः दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले.पुढील स्पर्धेसाठी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, व संस्थेचे जेष्ठ संचालक काकासाहेब ध्रुवसिंग बयस यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन उपाध्यक्ष अंकुश पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व संचालक मंडळ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक…

Read More

हक्काचं संरक्षण करतांना इतरांचे हक्क हिरावले जाऊ नये – न्या. सावरकरप्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु. येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धरणगाव न्यायालय व वकिल संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतच्या राममंदिर सभागृहात कायदेशीर शिबिर उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धरणगाव न्यायालायचे न्यायाधीश श्री. एस.डी.सावरकर साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणुन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.बी.के.आवरे, सरपंच सरलाबाई बडगुजर उपसरपंच, मंगल आण्णा पाटील, वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. संदिप सुतारे, ॲड.डी.ए.माळी, ॲड.गजानन पाटील, ॲड.सी.झेड.कट्यारे, ॲड. संदिप पाटील, ॲड.महेंद्र चौधरी, ॲड.प्रशांत क्षत्रिय, अँड.व्ही.एस.भोलाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ॲड.महेंद्र चौधरी यांनी जमीन वाटणी बाबत मार्गदर्शन केले तसेच ॲड. गजानन पाटील यांनी सातबारा उतारा व वहिवाट कायदा तसेच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील 28 वर्षीय शेतमजूर तरुणाला लग्न लावून देण्याचे आमिष।दाखवून 2 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने घेऊन दोन जण पसार झाले आहे त्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील २८ वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील रा. आमडदे ता. भडगाव यांनी तरूणाचे लग्न लावून देतो असे सांगून तरूणाकडून २ लाख रूपये रोख व ४० हजार रूपयांचे दागिने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील  ८८ वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून ६१लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,शहरातील विद्यूत कॉलनी परिसरात ८८ वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दिपीका शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधला. त्यांच्या संपर्क साधून स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्सूरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्सूरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. स्टार हेल्थ कंपनी इंन्शरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील बोरगाव खु येथे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडविला असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गेले असता रस्त्याची दुरवस्था पाहता बैलगाडीतून प्रवास करीत शेत रस्त्याची पाहणी केली. तालुक्यातील मौजे बोरगाव खु येथील शेतकरी स्वप्नील मुरलीधर पाटील यांचा शेतरस्ता गोपीचंद जामू पाटील यांनी अडविला होता याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी तहसीदारकडे शेतरस्त्याच्या मागणी साठी अर्ज केला होता या प्रकरणी मामलेदार कोर्ट अधिनियम अंतर्गत कामकाज सुरू करण्यात आले आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी सदर रस्त्याची पाहणी करणायसाठी गेले असता शेतरस्ताची दुरवस्था पाहता त्यांनी चक्क बैलगाडीतून प्रवास करत शेतरस्ता पाहणी केली .यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले…

Read More

महात्मा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक संस्कारांची गरज त्यासाठी महाराष्ट्रभर सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करणार – डॉ. सुरेश झाल्टेलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एरंडोल येथील मोठा माळीवाडा मधील बालाजी मढीमध्ये १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात पार पडले.प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल चे माजी नगराध्यक्ष माळी समाजभूषण देविदास भाऊ महाजन होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक राजकिशोर तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसिलदार अनिल माळी, या प्रबोधन शिबिराला धरणगाव शहरातील प्रमुख अतिथी राष्ट्रीय चर्मकार…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील शहा ऍग्रो याठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर हरभरा, रब्बी ज्वारी बियाणे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विधानसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, पी. एम. पाटील सर, राजेंद्र महाजन, किशोर शहा,तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, तंत्र अधिकारी राजेंद्र लोहार, बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, किरण वायसे, गजानन मोरे, विजय पाटील, ईश्वर पाटील तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.सागर पाटील सरांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, श्री राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश अमृतकर, सौ. संदीपा वाघ, श्री. विलाससिंग पाटील, श्री. बी.एच.खंडाळकर, श्री. सुमित पाटील, श्री. ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत .सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. काल रात्री लहान माळी वाडा माळी समाज पंच मढी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विजयी स्पर्धकांसह परिसरातील नागरीक उपस्थित होते. विचारपीठावर कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, चंदनगुरू व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मराठे, सामाजिक कार्यकर्ते बंडु सोनार, दिलीप महाजन व राजेद्र महाजन उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाची माहीती देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने सत्कार करण्यात आला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने बांबोरी प्र.चा. येथून मोठ्या प्रमाणात गिरणा नदी अवैध वाळूचा उपसा होत असे ज्या रस्त्याने वाळूचा करण्यात येत होता आज नायब तहसीलदार मंडल अधिकारी व कोतवाल यांनी सदरचे रस्ते खोदून तो रस्ता बंद केला. आव्हाने व बांबोरी प्र चा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीतून अवैध वाळूचा उपसा  सुरू होता. ग्रामस्थांनी अनेक वेळा याबाबत तहसील कार्यालयात तक्रारी केल्या होत्या या अवैध वाळू  वाहतूक मुळे अपघात झालेले आहे तसेच पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अवैध वाळू उपसा ने झालेल्या डबक्यामध्ये पाणी साचून अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे यामुळे हे रस्ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती आज…

Read More