लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पालकमंत्री गुलाबराव पाटील नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेतून निलेश राणे यांनी पालकमंत्र्यांवर अर्वाच्च भाषेत केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज धरणगाव येथे शिवसैनिकांनी निलेश राणे यांची प्रतीकात्मक अंतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अश्लील शब्द वापरल्याबद्दल धरणगाव शहरांमध्ये नारायण राणे याचे सुपुत्र निलेश राणे यांची अंतयात्रा हुबेहुब काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, भैय्या महाजन, राहुल रोकडे,योगेश वाघ व शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
आपेगाव व मुक्ताईनगर दोन्ही संस्थानने जपली परंपरा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दरवर्षी प्रमाणे भाऊबीजेला बहिणीसाठी भावाने साळी भेट देत असतात त्याप्रमाणे बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र आपेगाव संस्थान यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.भाऊबीजेच्या दिवशी संत मुक्ताबाईला साडी चोळी परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती. ह्यावेळी संत मुक्ताबाई रविंद्र हरणे महाराज यांच्यासह जिजाभाऊ मिसाळ यांनी सहपत्निक संत मुक्ताईची पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली. यावेळी कार्यक्रमाला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मेजर धर्मराज पाटील तसेच भडगाव तालुका सदस्य महेंद्र केदार यांनी आज धरणगाव येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा विकल्प ऑर्गनायझेशन तर्फे सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित महाराष्ट्रातील दुसरे मल्लविद्या कुस्ती केंद्र धरणगावात स्थापन करण्यात येणार आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश मानगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्ती केंद्र स्थापन करण्याच्या मानस आहे. यासंदर्भात आज कुस्ती मल्लविद्या महासंघ धरणगाव तालुक्याची मिटिंग विकल्प ऑर्गनायझेशन च्या कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी मेजर धर्मराज पाटील व महेंद्र केदार यांचा शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आघाड्यांच्या तिडा सुटल्याचा नाव घेताना दिसून येत नाहीये पूर्वी सर्वपक्षीय आघाडी होणार म्हणून सर्व पक्षांनी कोर कमिटी बनवली मात्र काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्वपक्षीय आघाडी न होता सर्व पक्षांनी अर्ज भरले महा विकास आघाडी होणार म्हणून बैठका झाल्या मात्र चोपड्याच्या जागेवरून अजूनही वाद सुरू असल्याने तोही तिढा सुटला नसल्याने आज सोमवार दुपारी माघार ची मुदत असल्याने माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार का असेच चित्र दिसू लागले आहेतसंसर्ग प्रादूर्भावामुळे तब्ब्ल तीन ते चार वेळा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती. दिड वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम सहकार विभागाकडून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील दुध फेडरेशन जवळील रस्त्यावरून जात असतांना धान्याने भरलेली ट्रक खड्ड्यामुळे उलटून घरासमोर लावलेल्या कारवर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महापालीकेविरोधात रोष व्यक्त केला. शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या अमृत योजनेच्या काम शिवाजीनगर परिसरात देखील या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात त्या कारच्या काचा फुटल्या आहेत. या मार्गावर वारंवार…
शेतकरी सुखी तर जग सुखी – ना.गुलाबराव पाटीलधरणगाव लक्ष्मण पाटील: शहरातील साने पटांगणावर महात्मा बळीराजा लोकोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी, महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महात्मा बळीराजा यांच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व समाधानी होता. लोककल्याणकारी राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती, म्हणूनच दिवाळी सणामध्ये घराघरातील माता-भगिनी म्हणतात – “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा महान राजाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांना विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी पाटील सरानी आपल्या शहरात महात्मा बळीराजाचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊबजीचे औक्षण करून इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्याच्या आदेशानुसार युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस व महानगर यांच्या वतीने शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. सर्वसामान्यांचे जगणे सोपे करण्याची गरज असताना केंद्र सरकार मात्र सतत भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे,म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दीपावली सण हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करण्यासाठी दिपावली निमित्ताने मातंग समाजाला भैया भाऊ महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले.मातंग समाजाने आपली दिवाळी उत्साहात साजरी करावी यासाठी भैयाभाऊ महाजन यांनी अनोखी संकल्पना राबविली.या प्रसंगी माळी समाजचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांचे हस्ते मरीआई माताचे पुजन केले. गोर गरिब मातंग समाजाची दिपावली ही सुख समृद्धीची आनंदाची जाओ या साठी भैयाभाऊ यांनी घरोघर जाऊन मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.मातंग समाजाचा वतीने महिलांनी भैयाभाऊ महाजन यांचे औक्षण करून स्वागत केले या कार्यक्रमाला उपस्थित माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी ,सुभाष महाजन .राजु सुकलाल महाजन भैयाभाऊ महाजन .राहुल भाऊ महाजन .महेंद्र वऱ्हाडे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरातील एका दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव येथील साथीदारांच्या सहाय्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मध्यप्रदेशातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. भारतसिंग आयासिंग भाटिया (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहरातील संत चोखामेळा वस्तीगृहामागील नंदुरबारकर सराफ या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतांना दिव्यांग, गतिमंद मुलांनी देखील सामाजिक भावना जपत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला आहे. रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दीप प्रज्वलित करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, ह.भ.प.दादा महाराज जोशी, भाजप गटनेते भगत बालाणी, डॉ.स्नेहल फेगडे, सुप्रीम कंपनीचे अनिल काबरा, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, डॉ.आदित्य माहेश्वरी, धनराज कासट, मनिषा पाटील, विनोद शिरसाळे, आदींसह उडानचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी चिमुकले श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दिव्यांग बालकांनी ११५१ तेलाचे दिवे प्रज्वलित केले.…

