Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणूकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बोदवड विकास सोसायटी मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचादेखील संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी बातमी म्हणजे माजी आमदार स्मिताताई वाघ यांचा अंमळनेर विकास सोसायटी मतदार संघात उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड झालेले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अर्ज छाननीत भाजपला मोठा धक्का बसला असून खासदार रक्षाताई खडसे व अमळनेर विकास सोसायटी मतदार संघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांचाभाजपा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला असून राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते बिनविरोध होणार आहेत याची घोषणा लवकरच होईल.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील गायरानसाठी गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी आरक्षित आहे.या जागेवर मुबईच्या एक संस्थेने अतिक्रमण केले आहे. याआरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत काढण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी करणेबाबत गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. येथील गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी असलेले गायरान आरक्षित जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेले अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांनी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी धरणगाव तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेश दिलेले असुन अद्याप सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने धरणगाव येथील गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी मंचचे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला देण्यात आला. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहननाना पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंदआबा देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, विद्यार्थी उपाध्यक्ष वासुदेव…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शासन सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. हे उपक्रम गावपातळीपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी महसुल विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अशी सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री. गमे पुढे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील निमखेडी शिवारात सदनिका खरेदी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६) रा. रिधुर वाडा शनीपेठ यांनी ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस…

Read More

पाचोऱ्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने ना. एकनाथ शिंदेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या  राजकारणाची माहिती आ. किशोर पाटील यांचे कडून जाणून घेतली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा  नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीती बाबत त्यांनी गुप्तगू केली. शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले. या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनासह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील धरणी परिसरात ‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’ चे उदघाटन आज दि. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाप्रेमींची चहाची आवड लक्षात घेऊन अस्सल गुळाचा चहा झक्कास टी हाऊस च्या माध्यमातून तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत या हेतूने लक्ष्मी दुग्धालय चे उदघाटन धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. आज ‘कोजागिरी पौर्णिमा व ईद – ए – मिलाद’ च्या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून दुधात साखर आणि चहा चे मिश्रण एकजीव व्हावे अगदी तशाच प्रकारे या दोन्ही फ्रेंचायजींचा उदघाटन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट हे तीन वर्षापासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. याला रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली असून लवकरच भुयारी मार्गाचे कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंकज महाजन यांनी आज मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी पत्राद्वारे कळविले आहे. भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट नंबर १५३ गेल्या तीन वर्षापासून भुयारी मार्गाचे कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या फार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटांना संकटांचा सामना करावा लागत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर सर्व पक्ष किंवा महा विकास आघाडी झाल्यास तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून पहिले चेअरमन म्हणून गुलाबराव देवकर हे आमचे ठरले असल्याचे बिनविरोध निवड झालेले जिल्हा बँकेचे सदस्य संजय पवार यांनी महाराष्ट्र लाइव्ह शी बोलताना सांगितले. महाराष्ट्र लाईव्ह संवाद संस्थांना जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित सदस्य संजय पवार म्हणाले की गेल्या तीन पंचवार्षिक पासून धरणगाव तालुका प्राथमिक शेती सोसायटीतून मी प्रतिनिधित्व करीत आहे पंधरा वर्षापासून सर्वपक्षीय मतदान म्हणजे राष्ट्रवादी भाजप शिवसेना काँग्रेस यांच्या मतदार यामुळे विरोध होत असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांना श्रेय दिले तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे मतदार जे शेतकरी आहेत त्यांनाही त्यांनी या…

Read More