लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फ नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन आज 10 रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील टॉवर चौकात करण्यात आले.महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व ग्रामीण तर्फ देशद्रोही नवाब मलिक यांचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेमध्ये माघारीनंतर अनेक घडामोडी घडत आहे जिल्हा बँकेत भाजपने माघार घेतली आहे.तर नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले पॅनल बनविले असून त्यांनी बलाढय नेत्यांना आव्हान दिले आहे तर रावेर मध्ये मात्र वेगळेच पॅटर्न पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केल्यानंतर चक्क कॉंग्रेसच्या उमेदवाराने जाहीर पाठींबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.या जागेसाठी कॉग्रेस चे आमदारशिरीष चौधरी यांनी खूप प्रयत्न केले होते ती त्यांना मिळाली सुद्धा होती मात्र कॉग्रेस च्या उमेदवाराने दुसऱ्या च उमेदवाराला पाठींबा जाहीर केला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारी नंतर अनेक घडामोडी होत आहे. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार…
प्रतिनिधी प्रविण पाटील: आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करीत जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबन राजु वाघ यांनी बीडीओ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले.औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाठ यांनी ०८ रोजी औरंगाबाद येथे सरपंचांचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना, शासकिय व्यासपीठावरुन ग्रामसेवक संवर्गाबद्दल “भामटा, हरामखोर ” अशी अपशब्द वापरुन संवर्गाची बदनामी केली तसेच, ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तीक जबाबदारीचे भान न ठेवता दोघांमध्ये कसा तेढ निर्माण होईल ? अशा दृष्टीने, ग्रामसेवक तुमचा नौकर आहे, तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्याचे ऐकु नका, असे वेजबाबदार विधान करुन दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन संशयितांना जळगावातील तांबापुरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. दोघांना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे हे वरणगाव फॅक्टरीत नोकरीला आहे. आपल्या कुटुंबीयांसह कोथळी येथे वास्तव्याला आहे. विनोद शिंदे यांच्या काकाचे निधन झाल्याने त्यांच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बोईसर नवापूर येथे आई व वडील यांच्यासोबत बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौक परिसरातील दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रसाद यशवंत काळे (वय-४७) रा. आसोदा ता. जि.जळगाव ह.मु. गणेश नगर, आकाशवाणीच्या मागे जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जैन कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य गावाला गेले होते. प्रसाद काळे यांची कंपनीत रात्रपाळी असल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील…
माघारी अर्जानंतर लढतीचे चित्र स्पष्ट ५ गटातील ४२उमेदवारांच्या सहकार व शेतकरी पॅनलमध्ये होणार लढती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणूकीसाठी ८ नोव्हेंबर रोजी १०८ उमेदवारांच्या माघारीनंतर ५ गटातील ४२ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढवित असलेल्या ४२ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून मंगळवार दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन ते तीन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी सहकार व शेतकरी पॅनल गठीत केले असून बुधवारपासून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. तर निवडून आलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आडाखे बांधणे सुरू असून यात चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे. २०२१-२०२६ साठी जिल्हा बँकेच्या २१…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू नं. ०१ शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगांव येथील हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने स्वर्गवासी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ व सिरतुन्नबी निमित्त आयोजित कार्यक्रमात भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदरचा कार्यक्रम अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षीय स्थान अंजुमन तालीमुल मुस्लिमीनचे चेअरमन एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांनी भूषविले. यावेळी डाॅ. अब्दुल करीम सालार, भुसावल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली, नगरसेवक इब्राहीम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँक प्रस्थापितांचा एक वर्ग तयार झालेला आहे या प्रस्थापिताच्या वर्गाला आव्हान देण्यासाठी शेतकरी विकास पँनल तयार केले आहे ही बँक सर्व सामान्य माणसाची आहे धन्यधण्याचे कारस्थान उथळून लावण्यासाठी हे पॅनल उभे केले असल्याचे कॉग्रेस चे माजी प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा पक्षातील काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल तयार केले असून यात अरुणा दिलीपराव पाटील काँग्रेस विकास मुरलीधर पवार राष्ट्रवादी काँग्रेस वाघ विकास ज्ञानेश्वर कल्पना शांताराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस रवींद्र सूर्यभान पाटील भारतीय जनता पार्टी राजू रघुनाथ पाटील सुरेश शांताराम…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१” साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील नामांकित आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे ह्यावर्षी दिला जाणारा “खान्देश भूषण पुरस्कार” व मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, कर्जोद ता. रावेर जि. जळगाव यांच्या तर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी धरणगाव येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची निवड करण्यात आली आहे. पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज आणि विश्वसनीय मान्यवरांनी सुचवलेल्या नावांची छाननी करून ही…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . भाजप पक्षाचे सर्व 18 उमेदवारांनी माघार घेतली आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना आ महाजन म्हणाले की सर्व ठरले असताना यांनी यु टर्न घेतला आमच्या खासदार, आमदार याचे अर्ज बाद केले त्यामुळे भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे म्हणून निवडणुकीतुन माघार घेतली आहे.यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2.45 वाजेला भाजप पक्षाचे सर्व उमेदवार यांनी निवडणूक कार्यालयात…

