Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील पथराड तालुक्यात कृषी विभाग धरणगांव व आत्मा अंतर्गत रब्बी हंगामाच्या पूर्व नियोजनाबाबत किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बीटीएम आत्मा दीपक नागपुरे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील, प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच प्रवीण पाटील, तालुका कृषि अधिकारी किरण देसले, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ बाहेती सर, क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी लोटन पाटील, ऍडव्हान्टा कंपनी प्रतिनिधी पवार साहेब, आत्मा बिटीएम दीपक नागपुरे, तंत्र सहाय्यक राजेंद्र लोहार , कृषि सहाय्यक गजानन मोरे, अक्षय लोहार, मनोज पाटील, गजानन पाटील, सतीश बोरसे, राजेंद्र लंके व गावातील समस्त शेतकरी वर्ग उपस्थित होते…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी चार वाजेला महा विकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर मंथन होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडी चे फायनल बनवण्यासाठी कोर कमिटी तयार करण्यात आली होती मात्र ही बोलणी करणे महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.याच संदर्भात आज दुपारी चार वाजेला अजिंठा विश्रामगृह येथे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीत महा विकास आधारित पक्ष्यांना जागावाटप मुख्य विषय राहणार असल्याचे समजते महा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक येथील व्यवसायिक यांनी जळगाव येथील नामांकित सराफ व्यवसायिक व माजी खा ईश्‍वरलाल जैन याच्या कडून व्यवसायाचे कारण सांगून उसनवार २४ कोटी ६३ लाख १६ हजार रूपये घेतले ते परत न करता त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केल्याचे देखील उघड झाले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात नाशिक येथील अशोक बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया आणि जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करण्याची गरज…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील चुंचाळे येथील दोन भावंडे कालपासून बेपत्ता होते. आज दुपारी दोन्ही भावंडांचे त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. यावल पोलीसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. बुधवारी आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले स्वत:च्या चुंचाळे शिवारातील शेत गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा शोध घेण्यात आला परंतू ते कुठेही आढळून आले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून 27 कोटी 7 लाख 29 हजार रुपयांची (2707.29 लाख रुपये) भरपाई मंजूर झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यातील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी, बाजरी/कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती (Mid season Adversity) निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ऍक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी लाचेची मागणी करणार्‍या उप प्रादेशीक परिवहन कार्यालयातील पंटरच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांचा सहभागी असण्याची शक्यता असून यातील संशयितांची संख्या वाढू शकते. याबाबत वृत्त असे की, तक्रारदार हा वाहन मालकांकडून ऑथॅरिटी लेटर घेऊन वाहनांच्या हस्तांतरणाचे काम करत आहेत. या अनुषंगाने एका होंडा ऍक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीच्या हस्तांतरणासाठी ते आरटीओ कार्यालयात ६ ऑक्टोबर २०२१ रोजी आले होते. तेव्हा कार्यालयातील पंटर प्रशांत भोळे उर्फ पप्पू भोळे याने त्यांना स्वाक्षरीसाठी तीनशे रूपये आणि कार्यालयीन खर्च दिल्यानंतरच तुमचे काम होईल असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे रोड वरील गरीब नवाज ढाबा जवळ 31लाखाचे बायो डिझेल, साधन सामुग्री सह तीन जणांविरुद्ध बायो डिझेलची काळया बाजारात चोरटी विक्री करण्याचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने रॅकेट उघकीस आणले. जिल्हयांत बायो डिझेलचा काळाबाजार करणारी टोळी सतर्क असल्याबाबत   बातमी मिळाली होती. एलसीबीचे किरणकुमार बकाले सपोनि. जालिंदर पळे, सफौ युनुस शेख इब्राहिम, पोहवा सुनिल पंडीत दामोदरे, पोहवा दिपक शांताराम पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख,पोना दर्शन हरि ढाकणे, पोहेकॉ भारत शांताराम पाटील  या पथकाने  २७ रात्री सापळा रचून भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे रोड वरील गरीब नवाज ढाबा जवळील बायो डिझेलची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव  तालुक्यातील18 विद्यार्थी हा शहरातील कोतकर महाविद्यालयात एनसीसीच्या भरतीसाठी आला असताना त्याचा आज दुपारी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील कैलास वासूदेव राठोड (वय-१८) हा तरूण एनसीसीच्या भरतीसाठी शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे कोतकर महाविद्यालयात आज आलेला होता. दरम्यान मैदानी चाचणी दरम्यान पळताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कैलास वासूदेव राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची…

Read More

रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव महानगरपालिका आयुक्त…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथे ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाची बैठक ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी यशस्वीपणे संपन्न झाली. या “ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा” च्या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांनी केले. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा जगदाळे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे खान्देश प्रभारी सुधाकर बडगुजर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव पाटील व बहुजन नेते, माजी शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे होते. सर्वप्रथम उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंदनराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य महेश (बंटी) पवार, आदिवासी नेते विनोदराव…

Read More