लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ शहरात सात रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा सह 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.भुसावळ शहरात नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर गुलाब तडवी, रामचंद्र बोरसे, नाईक नितीन सपकाळे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक मनोज दुसाणे, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने धडक कारवाई करीत गावठी कट्टा बाळगणारे शेख ताहेर शेख आजाद आणि शेख रीजवान शेख इलियास (दोन्ही रा. मुस्लिम कॉलनी) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ईदगाह रोडवरील हिरा हॉलजवळ गुरूवारी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कोरोना च्या काळामध्ये बंद असलेल्या शाळा बऱ्याच कालावधीनंतर शासनाच्या आदेशानंतर सुरू झाल्या आहे याचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या मुखावर दिसून येत आहे यासाठीच हिरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्गखोल्या यांसह संपूर्ण शाळा फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.कोरोना या काळात बंद असलेल्या शाळा दिवाळीच्या परवा नंतर सुरू झाल्या यासाठी शिक्षकांनी मैदानासह शाळेतील संपूर्ण वर्ग सजवले आज हिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांसह शाळा हि सजली होती. हिरा इंटरनेशनल स्कूल, धरणगांवचे उपस्थित शिक्षक – प्राचार्य जयेशकुमार मेहता, उपशिक्षक – लतिका मेशरी, अग्नेश जोश, पूजा सिंधी, ललिता पाटिल, प्रणीता येवले, रोहिणी पाटिल, राधिका काबरा, अश्विनी शिंपी, करुणा साळूंखे,…
प्रतिनिधी अमोल पाटील: आपण राज्यमंत्री असतांना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यभरात या प्रकारातील रस्ते बनत आहेत. आतापर्यंत प्रति किलोमीटरला एक लाख रूपये इतकी तरतूद यासाठी होती. मात्र यापुढे जिल्हा नियोजनमधून हीच रक्कम आता तीन लाख रूपये प्रति किलोमीटर इतकी वाढविता येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी दरम्यान सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी चक्क मोटारसायकलवर स्वारी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर या कामाला वेग देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. तर, स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच हा रस्ता होत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र माघारीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील काँग्रेसचे राजीव पाटील व महाविकास आघाडीच्या जनाबाई पाटील हे रिंगणात होते मात्र जनाबाई पाटील व काँग्रेसचे राजीव पाटील यांनी माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे रावेर विकासाची जागेवर माजी आमदार अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसचे राजीव पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी होताना दिसून येत आहे यात रावेर विकास मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाने हट्ट धरला होता व आपला उमेदवार दिला होता तो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल व डिझेल वरील एक्साईज कर प्रतिलिटर अनुक्रमे ५ व १० रुपयांनी कमी जनतेला मोठा दिलासा दिला होता. सदर दर कमी करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस व सर्व विरोधी पक्षांनी मोठमोठी आंदोलने केली होती, परंतु केंद्र सरकारने दर कमी केल्या नंतर भाजपा शासित राज्ये वगळता कोणत्याही राज्याने पेट्रोल व डिझेल वरील दरात कपात केलेली नाही, यासाठी भाजपा जळगांव च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री आ. गिरीषजी महाजन, खासदार रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे राज्यातील मविआ…
कुडे व बालकवी विद्यालयाच्या माजी विद्यार्थाचे यशप्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील सा. दा. कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुस्तीपटू अक्षय देविदास सोनवणे या विद्यार्थाची गोवा येथे नुकत्याच झालेल्या 9 वी मास रेसलिंग स्पर्धेत त्याची 56 किलो वजन गटात निवड झाली होती. त्याने फायनल मध्ये झारखंड च्या मल्लास पराजित करून गोल्ड मेडल मिळवल्याने त्याची आता आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, डी. आर .चव्हाण, के. जे. पवार, क्रिडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटीया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) रा. सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय .म्हणून नोकरीला आहे. दिवाळी निमित्त त्याची पत्नी व दोन्ही मुले माहरी मनमाड जि.नाशिक येथे गेल्या होत्या. तर वडील जयप्रकाश मनिराम चांगरे हे रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते शहरातील नवल कॉलनी येथे…
इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शनिपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत गुरुवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कोसळली. यामध्ये किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर सामान्य रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे जीवित हानी झालेली नाही. यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये गाढ झोपेत असताना शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानगरपालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. ढिगाऱ्याखाली…
शासन निर्णय जारी, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची वचनपूर्तीलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव येथील विस्तारीत भागासह संपूर्ण शहराच्या पाईपलाईनसाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज नगरविकास खात्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे. तब्बल पाच दशकानंतर धरणगावातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून यामुळे शहरात पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडसर दुर झाला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जलवाहिन्यांच्या कामांसाठी लवकरच निधी मिळणार असल्याची केलेली घोषणा या माध्यमातून प्रत्यक्षात उतरली आहे. तर. ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून धरणगावच्या इतिहासातील या मोठ्या कामांना लवकरच…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरात जवाहर रोड गुजराथी गल्ली, धरणगांव तालुक्यात खामखेडा, सार्वे, बाभळे, येथील परवानाधारकांनी राजीनामा दिल्याने तसेच विवरे, भोकणी, मुसळी बु, शेरी, कल्याणे बु. या पाच महसुली गांवात दुकान नसल्याने व बोरगांव बु. येथील रद्द केल्याने व गारखेडा येथे विनापरवानगीदिर्घ मुदतीपासुन रजेवर असल्याने या ११ ठिकाणी नव्याने स्वस्त धान्य दुकानांचे जाहिरनामे दि. १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी जाहिर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी अर्ज धरणगांव पुरवठा विभागात उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.२० नोव्हेंबर- २०२१ पर्यंत आहे, अशी माहिती धरणगांव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली.यासाठी गावातील ग्रामपंचायत, बचत गट, सहकारी संस्था, आदिना अर्ज करता येणार आहे. अशी माहिती ही…

