Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ डिसेंबर २०२१ आहे.पदाचे नाव आणि जागा : 1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 3262) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव. अर्जाचं शुल्क बँक ऑफ बडोदाकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 60 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवार, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क द्यावं लागेल. ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा? पात्र…

Read More

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – ऑनलाइन गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की साधारण एक लाख ४८ हजार कोटी डॉलर्स किमतीचा एक हजार किलो गांजा आत्तापर्यंत अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकला गेला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी १४ नोव्हेंबररोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी लक्षात आलं की हे लोक अ‍ॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली कंपनीची कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आधीही या संचालकांशी गांजा तस्करीविषयी चौकशी केली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचारींचा संप सुरू असताना आज प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेत बससेवा सुरू केली. आज धुळे आगार बसस्‍थानकातून चार बस मार्गस्‍थ झाल्‍या. या चार बसवर अज्ञातानी हल्‍ला करत बसच्या काचाफोडल्याचा प्रकार घडला. धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तब्बल १४ दिवसानंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटामध्ये या बसेस आगारा बाहेर पडल्‍या. परंतु मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी व्यक्तींनी चार बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून संप पुकारला आहे आणि आज शासनाच्या आदेशाने पुन्हा बस सेवा सुरू करण्यात आली आहे बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शविला त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलेबहुजन क्रांती मोर्चा ने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे तर आज शासनाच्या आदेशाने जळगाव धुळे बस सेवा सुरू करण्यात आली याला विरोध दर्शविला म्हणून बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 53.5 टक्के मतदान झाले होते जिल्हा बँकेमध्ये मुख्यतः सहकार पॅनल व शेतकरी पॅनल यांच्यात लढत आहे सहकार पॅनल मध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा समावेश आहे तर शेतकरी पॅनल मध्ये  भाजपा काँग्रेस व राष्ट्रवादीमधील बंडखोर या उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या चार विविध कार्यकारी सोसायटी आणि पाच राखीव जागांसाठी आज मतदान होत आहे. यात ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंधरा तालुक्यांत मतदान केंद्र आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील। तालुक्यातील साळवा येथील शिवारात गावठी हातभट्टील उध्दवस्त करून सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना शनिवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांने दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास साळवा शिवारात धडक कारवाई करत सुरू असलेली गावठी हातभट्टी उध्दवस्त केली. या कारवाईत सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करण्यात आले. संशयित…

Read More

चंदिगढ वृत्तसंस्था: हरियाणातील संपत येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद होत होते याच चरित्र संशयातून पतीने पत्नीवर तीस वार करून पत्नीचा खून केला याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे पती शत्रुघ्न व पत्नी पूनम राहत होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं, यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वाढीव वीज बिल, वीज कनेक्शन तोडणे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र भरात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शहरातील नवीन बसस्थानकाच्या आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीज बिल देणे रीडिंग वेळेवर न घेणे, वाढीव वीज बिलापोटी लोकांचे वीज मीटर काढून घेणे, शेतकऱ्यांना रोहित्र जळाल्यानंतर महिना महिनाभर बसवून दिले जात नाही, तसेच या दिवाळीपासून महाराष्ट्रभरातील एसटी कर्मचारी खाजगीकरणाचा विरोध करून शासनात विलिनीकरणाची मागणी करत आहे. त्याप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची कोणतेही सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी दखल घेताना दिसत नाही. याउलट परिवहन मंत्री वेळोवेळी हायकोर्टाचा दाखला देत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पोलीस भरतीला आलेल्या एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी माक्स चा उपयोग केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर एका मैदानात कानात ज्वारीच्या दाणे एवढे ब्लूटूथ बसून मार्चमध्ये लपलेली होती हा सगळा प्रकार तपासणीत आडला मार्चमध्ये चिप पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी शुक्रवारी राज्यभरात परीक्षा पार पडल्या. एकूण 720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांचे  अर्ज आले होते. या औरंगाबाद जिल्ह्यातील 80 केंद्रांवर 21 हजार उमेदवारांची सोय करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. एका उमेदवाराने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ असलेल्या एका पान टपरीमध्ये दोन जण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी ७ वाजता छापा टाकला. यात ३ हजार ६२० रूपये किंमतीचे ४ भारत गॅस कंपनीचे सिलेंडर, ९०५ रूपये किंमतीचे रिकामे सिलेंडर, ७ हजाराचा इलेक्ट्रॉनिक काटा आणि १२ हजार रूपये किंमतीचे गॅस…

Read More