Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव लक्ष्मण पाटील : येथे आत्मा समितीची बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम CDS बिपीन रावत यांना श्रदधांजली अर्पण करुन सदरील बैठकीस सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित सर्व सदस्यांचे आत्मा व कृषी विभागाकडून स्वागत करण्यात आले. समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील व राज्य पातळीच्या समितीच्या सदस्य पदी निवड झालेले राजेंद्र महाजन यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी केला. सदरील बैठकीत आत्मा योजनेबाबत संपूर्ण माहिती आत्मा बिटीएम दीपक नागपुरे यांनी उपस्थित सर्व सदस्यांना दिली. आत्मा योजनेअंतर्गत गट स्थापन करून शासकीय योजनेचा काय काय लाभ घेता येईल याची सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी महाडीबीटी यांत्रिकीकरण या योजनेबाबत सर्व सदस्यांना माहिती…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ग्लोबुसेल या लाईफ सेव्हिंग औषध खरेदी विक्रीचा वैध  परवाना नसतांना हे औषध विक्री केल्याचा खोट्या व बनावट बिले तयार करून फसवणूक केल्याचा भयंकर प्रकार चाळीसगावात उघडकीस आला असून याप्रकरणी औषध निरीक्षक, जळगाव यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती अशी की, ग्लोबुसेल हे लाईफ सेव्हिंग औषध असून ते सुदृढ व्यक्तीच्या रक्तापासून निर्माण केले जाते. असे असतांना संशयित जितेंद्र प्रभाकर खोडके रा. कळमडू ता. चाळीसगाव जि. जळगाव मालक जोगेश्वरी फार्मा, शॉप नं.60, घाटे कॉम्पले्नस, भडगाव रोड, चाळीसगाव यांनी त्यंाचा औषध खरेदी विक्रीचा वैध परवाना नसतांना तसेच ग्लोबुसेल इंजे्नशन उत्पादन…

Read More

मुंबई वृत्तसंस्था : अंधेरीतील वर्सोवा भागात काम करण्यासाठी जाणारी अल्पवयीन नोकरानी कामावर उशिराने आल्याने तिला  जबर मारहाण करून निर्वस्त्र व्हिडीओ काढल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे .या मारहाणीत अल्पवयीन नोकरानीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सदर मालकिनीविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पश्चिमेला वर्सोवा परिसरात पीडित 17 वर्षाय मुलगी घरकाम करते. पीडिता नेहमीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी घरकामासाठी सदर घरी  कामावर पोहोचायला तिला थोडा उशिर झाला होता. यामुळे घर मालकीन तिच्यावर रागावली होती. पीडित मुलगी कामासठी घरी येताच रागाने लाल झालेल्या मालकिनीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकिनीने आधी तिला गंभीररित्या मारहाण केली. त्यानंतर तिला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील जीएमसीत 49 जागा भरण्यात येणार आहे, यासाठी शुक्रवारी मुलाखतीला सुरुवात झाली आहे. यात सहायक प्राध्यापक पदाच्या 19, वरिष्ठ निवासी डॉक्टर 18 तर 12 वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जीएमसीत विविध विभागात रिक्त असलेल्या तीन प्रकारातील जागांसाठी आरक्षण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून रिक्त जागांचा तपशील तयार करून त्यानंतर या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. या अंतर्गत या सहायक प्राध्यापक पदांमध्ये शरीरशास्त्र 2, जीव रसायनशास्त्र 1, सुक्ष्मजीवशास्त्र 2, त्वचा व गुप्तरोग 1, शल्यचिकित्साशास्त्र 1, औषध वैद्यकशास्त्र 3, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र 1, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र 3, क्ष किरणशास्त्र 1, बधिरीकरणंशास्त्र 2, अशी 19 पदी भरली…

Read More

त्याग, समर्पण आणि बलिदान म्हणजेच बाबासाहेब- पी.डी.पाटील सरधरणगाव लक्ष्मण पाटील : येथील पिंपरी खु. येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक सतिश शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात बहुजन महापुरुषांची विचारधारा जनमानसात रुजविणारे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम आयोजित केला, असे मत कार्यक्रमाच्या सुरवातीला शिंदे सरांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत व त्यांच्या सर्व साथीदारांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमनाने पाळधी ला 50 निराधार महिलांना किराणा सामानाचा किट वितरित करण्यात आला. तालुक्यातील पाळधी येथे 10 रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 50 निराधार महिलांना पत्तीशे रुपयांचा एका महिन्याचा किराणा किट व पुढील महिन्याचे किराणा व्हाउचर वितरित करण्यात आले. या प्रसंगी माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच पाळधी सुधिरभाऊ पाटील, पं.स. सदस्य सचिन पवार, एकलग्न सरपंच संजय पाटील, तहसिलदार नितीनकुमार देवरे, वर्ल्ड व्हिजन चे मुख्य अधिकारी अनिल तेजप्पा, विजय राऊत, तलाठी प्रशांत पाटील, मंडळ अधिकारी अमोल पाटील हजर होते.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात तरूणाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी  ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोबारा केला आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कैलास सुरेशकुमार कुकरेजा (वय-३४) रा. सिंधी कॉलनी पाचोरा, हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान कैलास कुकरेजा हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. आज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनीटात घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ३ लाख ८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लांबविले. याप्रकरणी कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर महसूल विभागाने पहाटे कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेतले परंतू कारवाई करत असताना सोबत असलेल्या दुसऱ्याने वाळूने भरलेले ट्रक्टर घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार महसुल पथकातील कोतवाल राजेंद्र तुकाराम थोरात (वय-४५) रा. कोळगाव ता. भडगाव यांनी ९ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कारवाई करत संशयित आरोपी दादु उर्फ कैलास पाटील याला ताब्यात घेतले. महसूल विभागाने कारवाई केल्याचे पाहून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या एक महिन्यापासून संप सुरू आहे या संपात सहभागी असलेल्या रावेर डेपोतील बस चालकाला निलंबित करण्यात आले होते यामुळे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित कर्मचारी च्या सावधगिरी मुळे त्याचे प्राण वाचले. रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी राहुल विश्वनाथ कोडी वय वर्ष 35 हा रावेर डेपो मध्ये बस चालक आहे गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या संपामध्ये तोही सहभागी झालेला असून या कारणामुळे त्याला आज निलंबित करण्यात आल्याचे पत्र मिळाले होते एकीकडे संपत सुरू आहे तर दुसरीकडे निलंबनाची कारवाई यामुळे नैराश्‍य आलेल्या कोंडीने आज…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : वरणगाव महामार्गावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांमधून डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून गाडी ,डिझेल व डिझेल चोरी करण्याचे साहित्य  असे 4 लाख 79 हजाराचा 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महामार्गावर असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर उभे राहणाऱ्या गाड्यांमधून गेल्या वर्षभरापासून डिझेल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती अशाच डीजल चोरी करणार्‍या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याना मिळाली होती . मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउनि अमोल देवढे,सफै अशोक महाजन युनूस शेख सुनील दामोदरे जयंत चौधरी दीपक पाटील महेश महाजन नंदलाल पाटील प्रमोद…

Read More