लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (विशेष प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा यात्रा घोडेबाजार साठी जसे प्रसिद्ध आहे तशीच ती येतील दत्त मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे यावेळी जरी घोडेबाजार भरणार असला तरी मात्र इतर दुकानांना प्रशासनाने परवानगी नाकारल्याने व्यापारी व छोटे दुकानदारांचा हिरमोड झालेला दिसत आहे.
कोरोना मुळे घोडेबाजार व दत्त भगवान ची यात्रा बंद होती कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे
या वर्षी घोडेबाजार असल्याने अश्वप्रेमी खरेदीदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य दिसत आहे. मात्र प्रशासनाने इतर खेळणी साहित्य, मनोरंजनाचे, शेती साहित्य, मसाले पदार्थ दुकान, कटलरी, शीतपेये दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने आदी सर्व स्टॉल यांना परवानगी दिलेली नाही यामुळे या विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.